मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांची लहू सेने चे शिष्टमंडळाने घेतली भेट .
नागपूर ः लहू सेने च्या वतीने विधान सभेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री. देवेन्दजी फडणविस यांना लहू सेना प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सातते आठ वर्षा पासून अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद असून , या वर्षी १०० कोटी रूपये ची तरतूद महामंडळा साठी केली आहे .त्या मधून बॕन्ड व्यवसाय करणाऱ्या कलाकार आणि चिंधी बाजार व्यवसाय करणाऱ्या करीता स्वतंत्र आर्थिक पॕकेज ची घोषणा करून त्यांना बिनव्याज पाच लाख रूपये पर्यत चे कर्ज मिळावे. लाॕकडाऊन मुळे मातंग समाजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .त्या मुळे त्यांचे विज बिल माफ करावे . महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या विविध समाज घटकांना सामाजिक न्याय तथा समता आधारित सर्व योजनांचा फायदा [प्रशिक्षण व संशोधन] सर्व समाज बांधवांना मिळावा या साठी बार्टी ची स्थापना केली .परंतु बार्टी च्या योजनांचा लाभ अनुसूचित जाती मधील मातंग ,चर्मकार , वाल्मीकी,होलार , मांग-गारोडी ईत्यादी समाज घटकांना योग्य प्रमाणात मिळालेला नाही. महाराष्ट्रातील या उपेक्षित समाजा मध्ये प्रचंड नाराजी आणि संताप पसरलेला आहे , सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ” आर्टी ” ची स्थापना करून उपेक्षित समाजाला न्याय द्यावा . आसे निवेदन विधान सभेचे विरोधी पक्ष नेते मा.श्री.देवेन्दजी फडणविस यांना लहू सेने चे शिष्ट संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वशी…दिलीप वानखेडे, रविन्दन खडसे, जावेद पठाण, दिपक गायकवाड , अशोक खडसे , बाल्या खडसे, ईत्यादी उपस्थित होते .