स्वर्गीय अर्जुनराव निवृत्तीजी गोतावळे यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने गोतावळे परिवाराकडून 325 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.
चारही भावंडांचा आदर्श समाजाने घेतला पाहिजे असे प्रतिपादन मुख्याध्यापक निब्रड सर यांनी अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले.
जिवती-५-माणिकगड पहाडावरील कुंभेझरी या गावातून वडिलांच्या अथक परिश्रम व आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात व इतर क्षेत्रात प्रगती केलेल्या गोतावळे परिवारातील बंधूंनी त्यांचे वडील स्व अर्जुनराव निवृत्तीजी गोतावळे यांच्या 5.8.23 रोजी सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दोन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले। सलग सातव्या वर्षी वडिलांच्या पुण्यस्मरण दिनावरील अन्नदानावर होणारा खर्च वाचवून शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे साहित्य देण्याची परंपरा सलग सात वर्षापासून गोतावळे परिवारातील बंधू जपत आहेत। जि प उच्च प्राथ शाळा टेकामांडवा व जि प उच्च प्राथ शाळा कुंभेझरी येथील 325 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे साहित्य तथा स्टेजडायस भेट देण्यात आला।याप्रसंगी कुंभेझरी येथे प्रा सुग्रीव गोतावळे, डॉ अंकुश गोतावळे, दिपक गोतावळे, लहुजी गोतावळे या समवेत भानुदास जाधव,ज्ञानोबा आकृपे, संतोष पाटील गोतावळे, प्रकाश राठोड,प्रेमदास राठोड, अंबादास जाधव लक्ष्मण राठोड उद्धव गोतावळे जयंत गोतावळे,पांडुरंग भालेराव,दत्ता गोतावळे मु अ रामकृष्ण निब्रड व इतर शिक्षकवृंद तर टेकामांडवा येथे मु अ लचु पवार , शामराव सुरनर दीपक गोतावळे व इतर शिक्षकवृंद होते। त्यांच्या या कार्याने फार मोठा आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे ।यातून इतर लोकांनी सुद्धा प्रेरणा घेण्यासारखे आहे। त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक व गावकरी यांच्याकडून कौतुक होत आहे।