किनवट पोलीस स्टेशन अंतर्गत बोधडी(बु.)येथील दोन अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करत गुन्हे दाखल
किनवट/प्रतिनिधी: किनवट पासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली फाट्या समोरील हायवे रोडवर आरोपी राजेश गंगाराम नामते वय 35 वर्षे व्यवसाय शेती राहणार बोधडी बुद्रुक तालुका किनवट दिनांक 28/ 1/ 2023 रोजी 11:15 वाजता यातील आरोपी हा चिखली फाटा समोर हायवे रोडवरून त्यांचे मालकीच्या कर मधून जात असताना बिनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी 15,380 रु चा माल व कार 3,00000 असा एकूण 3,15,380 रुपये किमतीचे प्रो गुण्याचा माल बाळगून व कार सह मिळून आला यावरून फिर्यादी संदीप दतराव वानखेडे वय 35 वर्षे व्यवसाय नोकरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. नंबर 23/2023 कलम 65(E)म.दा.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सावंत करीत आहे.
तसेच बोधडी बुद्रुक तालुका किनवट येथील गणेश बाबुराव केंद्रे वय 44 व्यवसाय धाबा चालक यांच्या राहते घरी विविध कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या एकूण किंमत 11030 रुपये चा विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वतःच्या फायद्यासाठी विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असताना प्रो गुन्ह्याचा माल बाळगून मिळून आला असता येजास खान इस्माईल खान पठाण यांच्या फिर्यादी वरून त्यांच्यावर गु.र.न.24/2023 कलम 65 (E)म.दा.का.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सावंत हे करत आहेत.