*कै. अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा.*
जिवती -२६-कै. अण्णाभाऊ साठे माध्य. तथा उच्च माध्यमिक विदयालय, व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत यांच्या वतीने कुंभेझरी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्रीमती शांताबाई मोतेवाड मॅडम व प्रमुख अतिथी संस्थेचे कोषाध्येक्ष जयाबाई नामवाड तसेच सरपंच कमळताई जाधव, उपसरपंच लहुजी गोतावळे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक निबरड सर, प्राचार्य, पाचभाई सर,पंचायत समिती चे माजी सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे सर, पोलीस पाटील संतोष गोतावळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रेम राठोड, ग्रामपंचायत सदस्य बाळू ठोंबरे, संतोष पवार, रवी जेवाले, रूुक्मीनबाई पवार, पुष्पा पट्टेवाले, भानुदास जाधव, रोहिदास तोगरे इतर ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.
प्रथमता राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शांताबाई मोतेवाड मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येऊन सलामी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वावरे सर यांनी केले. व 2023 च्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम, द्वितीय आलेल्या विध्यार्त्यांना पाहुण्याच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सामान्य ज्ञान स्पर्धत प्रथम, द्वितीय आलेल्या विध्यार्त्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
त्यानंतर कै अण्णाभाऊ साठे विद्यालय व कनिष्ठ महा./जि. प उच्च प्राथमिक शाळा कुंभेझरी येथील विध्यार्त्यांनी उत्कृष्ट असे देशावर आधारीत नृत्य सादर करून प्रेक्षकांची व्हा व्हा मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गांजरे सर, वाघमारे सर यानी केले तर आभार आमचे जेष्ठ शिक्षक लोडे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. मालेकर प्रा. जीवतोडे श्री जीवने सर श्री. पेन्दोर सर श्री आहेरकर सर श्री संकेत श्रीमती नंदनवार मॅडम श्रीमती बुच्चे मॅडम, नामवाड, मोतेवार बोरीकर व सर्व ेशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी,यांचे सहकार्य लाभले. मोठ्या संख्येने गावातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.