आंतरराष्ट्रीय सार्क परिषदेत अनिल साबळे यांनी मांडली राष्ट्र निर्माणा मध्ये ग्रामीण पत्रकाराची भूमिका
सिल्लोड – नवी दिल्ली च्या ग्रेटर नोएडा महानगर येथे 10-11 जानेवारी 2023 रोजी गौतम बुद्ध विद्यापीठ आणि सार्क जर्नलिस्ट फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप झाला. सार्क पत्रकार मंचाने अफगाणिस्तानमधील महिला पत्रकारांच्या दुर्दशेवर चिंता व्यक्त केली. गौतम बुद्ध विद्यापीठ आणि सार्क पत्रकार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात फोरमच्या प्रतिनिधींनी भारताने दक्षिण आशिया आणि जगभरात शांतता राखण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, सार्क पत्रकार मंचे राजू लामा, कुलगुरू प्रा. रवींद्रकुमार सिन्हा , आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या यजमान डॉ. बंदना पांडे, भारतीय जनसंवाद प्रसार संस्थाचे संचालक डॉ. संजय दीवेदी, भारताचे सार्क पत्रकार मंचचे डॉ. अनिरुद्ध सुधांशू यांची प्रमुख उपस्थिती होती या चर्चासत्रात भारत, नेपाळ, बांगलादेश,श्रीलंका इतर देशातील 100 हून अधिक पत्रकार, विषय तज्ञ आणि संशोधन अभ्यासक सहभागी झाले होते. यावेळी सिल्लोड येथील डी डी न्यूज, दूरदर्शनचे पत्रकार अनिल साबळे यांनी ग्रामीण भारताचे प्रतिनिधित्व करत सशक्त राष्ट्र निर्मिती साठी ग्रामीण पत्रकाराची भूमिका, दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रेस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पूर्ण वापर किंवा उपभोग आणि दुसरे, या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पत्रकारांची भूमिका आणि योगदान काय असावी यावर भाष्य केले. यावेळी पत्रकार साबळे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते सन्मान करून प्रमाणपत्र प्रदान केले आहे यावेळी सार्क पत्रकार मंचे प्र्तीनिधिनी नवी दिल्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन कार्यालयात कार्यक्रमा आयोजित करण्यात या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचे संचालक याचे प्रो. डॉक्टर संजय दिविदी यांच्या हस्ते पत्रकार अनिल साबळे यांचा सत्कार करण्यात आला आहे