सरस्वती विद्या मंदिर मांडवा येथे सावित्रीबाई यांची जयंती साजरी
किनवट = (ता.प्र.) तालुक्यातील मांडवा येथील सरस्वती विद्या मंदिर मा. शाळा येथे आद्यशिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बरेच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंंची वेषभुक्षा करुन आले होते.
विद्यार्थ्यिनींंनी सावित्रीबाईंंच्या जिवन चरित्रावर प्रकाशज्योत टाकत भाषण केले. एक दोन तीन चार आता करू महिला शक्तीचा जयजयकार, सावित्रीबाई फुले जयंतीच्या तसेच बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत या पुरोगामी व्यवस्थेच्या विरोधात सावित्रीबाई कणखरपणे उभी राहिली त्यामुळे सज्ञान झाली, माता माऊली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या देशातील आद्यशिक्षिका मुख्याध्यापिका याशिवाय त्या उत्कृष्ट आधुनिक कवयित्रीही भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी जयंतीदिन स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी साहित्य लेखन करून मराठी साहित्यात आपला ठसा निर्माण केला. या समयी शाळेचे मुख्याध्यापक नरसिंग नेम्मानीवार, नरसिंग इरपेनवार, किशोर कासाडीवार, अनिल भंडारे, सुरेश पतिंगराव, मंगेश भटकर, श्रीमती सुजाता समुद्रलवार, श्रीमती मेघा मुन्नेवारलू, सेवक भुमन्ना मुडपेल्लीवार इत्यादींची उपस्थिती होती.