किनवट तालुका पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी दत्ता जायभाये,सचिव दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलीक चव्हाण यांची निवड
किनवट (प्रतिनिधी):किनवट तालुका पत्रकार परिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक 22/12/2022 गरुवार रोजी मा. नगराध्यक्ष ईसाखान सरदार खान यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव नेममनिवार निवडणूक अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत इसाखान सरदार खान यांच्या फार्म हाऊसवर पुढील एक वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.जुन्या कार्यकारणीच्या कार्यकाळ संपलेला असून मावळते अध्यक्ष अनिल भंडारे व सचिव मलिक चव्हाण यांनी एकमताने बिनविरोध नवीन कार्यकारणीची घोषणा केली. अध्यक्षपदी दत्ता जायभाय सचिव पदी दिलीप पाटील तर कार्याध्यक्षपदी मलिक चव्हाण यांची निवड करण्यात आली.यावेळी पत्रकार परिषदेचे सल्लागार म.आ.चौधरी,शिवराज राघू मामा,दादाराव कयापाक,एड.मिलिंद सरपे,शकील बडगुजर,चतुरंग कांबळे,सुनील श्रीमनवार,जयवंत चव्हाण,आशिष देशपांडे,दुर्गादास राठोड,अनिल भंडारे,संदीप निखाते उपस्थित होते.नवीन कार्यकारणी पुढीलप्रमाणे- तालुका अध्यक्ष दत्ता जायभाये,सचिव दिलीप पाटील, कार्याध्यक्ष मलिक चव्हाण,उपाध्यक्ष गौतम येरेकर,सुरेश कावळे,सहसचिव किशन परेकार,कोषाध्यक्ष विवेक ओंकार,सहकोषाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे,सदस्य साजिद बडगुजर,एस.अहमद अली, मधुकर अनिलवार,संतोष सीसले,शेख मजहर, गजानन राठोड,संतोष जाधव,जयपाल जाधव,प्रमोद जाधव,सचिन जाधव,परमेश्वर पेशवे, नागनाथ भालेराव सतिश पाटील, दिपक तामगाडगे,यांची सर्वनुमते निवड करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे मा.अध्यक्ष दुर्गादास राठोड यांनी केले तर आभार विवेक ओंकार यांनी मानले. त्यानंतर जिजामाता,छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा बसवेश्वर,बिरसा मुंडा,अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालण्यात आले.सदर निवडीचे सर्वांनी स्वागत केले.