किनवट ते आदिलाबादचे अंतर थेट तीस किलोमीटर ने कमी ; प्रत्यक्ष रस्ता विकास कामाला झाली सुरुवात.
किनवट,प्रतिनिधी
स्वातंत्र्यपुर्व काळापासून मागणी असलेला किनवट तालुक्यातील घोगरवाडी ते तेलंगणा राज्यातील उमरी या गावांना जोडणारा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता बांधकामाला मूर्तरूप देण्यासाठी जनतेच्या मागणीचा सलग पाठपुरावा करत या रस्त्याची निर्मिती करून किनवट ते आदिलाबादचे अंतर थेट तीस किलोमीटर ने कमी करण्याचे जनतेचे स्वप्न आमदार भीमराव केरामांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.प्रत्यक्ष रस्ता विकास कामाला सुरुवात झाली असून आदिलाबाद व किनवटचे आमदार यांचे हस्ते लवकरच या रस्त्याचे लोकार्पन होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घोगरवाडी व तेलंगणा राज्यातील उमरी या 3 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची निर्मिती व्हावी अशी जनतेची स्वातंत्र्यपुर्व काळापासून आग्रही मागणी होती.याच मागणीच्या अनुषंगाने मागील विधानसभा निवडणुकांच्या काळात येथील जनतेने सदर रस्त्याची निर्मिती व्हावी अशी मागणी आ. भिमरावजी केरामांकडे केल्याने त्यांनीही त्या मागणीची पुर्तता करू असा शब्द दिला होता. दरम्यान दिल्या शब्दाला जागत जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त करून तसेच विविध विभागांच्या तांत्रिक अडचणींना दुर सारून घोगरवाडी ते उमरी या तीन किलोमीटरचा रस्ता निर्मिती करण्याचे मोलिक कार्य आमदार भिमरावजी केराम यांच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात साकार झाले आहे.विशेष म्हणजे उमरी पासून कोसाई हे अंतर अवघे दोन किमी असून आदिलाबाद हे अंतर पंधरा किलोमीटरच्या जवळपास आहे.एरव्ही किनवट व परिसरातील नागरिकांना आदिलाबाकडे जाय्यचे झाल्यास 70 ते 75 किलोमीटरचा प्रवास करून हे अंतर कापावे लागत होते.परंतू किनवट वरून घोगरवाडी ते उमरी या मार्गाने हे अंतर तब्बल 30 किलोमीटर ने कमी होणार असून किनवट व परिसरातील जनतेसाठी आदिलाबाद हे अधिकचे जवळ येणार आहे.यामुळे शेतकरी,व्यापारी व सर्वसामान्यांसाठी हा मार्ग हा अधिकच सुखकर होणार असून शिक्षण रस्ता व आरोग्य या आवश्यक सोयी सुविधासाठी वाहतूक व्यवस्था मिळणार आहे. तेलंगणातील आदिलाबादचे खासदार बापुराव सोयाम यांच्यासह आमदार बापुराव राठोड किनवट/माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते लवकरच या रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडून रस्ता जनतेसाठी खुला होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.शिवाय आज दिनांक 13 जून रोजी या रस्ता निर्माण कामाची पाहणी आमदार भिमरावजी केराम,सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार,तहसीलदार अनिता कोलगने,उद्योजक अनिल तिर्मनवार व सरपंच आत्माराम मुंडे,दत्ता आडे,आदींनी केली.