आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची 228 वी जयंती ) क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ किनवटच्या वतीने उत्साहात साजरी.
किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी शिक्षणाचे उद्धारकरते आद्य क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची 228 वी जयंती क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ सोसायटी येथे क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
त्यानंतर मान्यवराचे स्वागत किनवट तालुका अध्यक्ष संजय तलवारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन.टी. मोरे मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा उमरी बाजार )हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय कांबळे केंद्रप्रमुख खंबाळा, कृष्णकांत सुंकलवाड( केंद्रीय मुख्याध्यापक थारा),मारोती भोसले( सहशिक्षक पितांबर वाडी तथा राज्य प्रसिद्धीप्रमुख महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना) राजेंद्र नेवळे( सहशिक्षक सुभाष नगर उमरी बाजार) , आनंद भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला या परिसरातील महिला,तरुण,तरुणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.