सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
किनवट : येथील सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थीनींमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा आणि विद्यार्थीनींची चिकित्सक वृत्ती जोपासली जावी यासाठी विद्यार्थींनींद्वारे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच विज्ञान शिक्षिका श्रीमती संगिताताई राठोड होत्या तर उद्घाटन श्री.पी.एम.राठोड यांनी केले. प्रदर्शनात विद्यार्थींनींनी हवेच्या दाबावरील प्रयोग, गतिज उर्जेच्या माध्यमातुन विद्युत निर्मिती, पावसाच्या पाण्याचे साठवन(रेन वाॅटर हार्वेस्टिंग), पाण्याची घनता, नैसर्गिक दर्शक अशा अनेक प्रकारच्या प्रयोगाची माहिती सांगितली. विज्ञान विषय शिक्षिका सौ.तोरणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्रीमती किर्ती वाढवे व श्रीमती सपना मंडारे यांच्या सहकार्याने सदरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. विज्ञान प्रयोगाच्या परिक्षणासाठी श्री गोमाजी चव्हाण व श्री निलेश भिलवडीकर यांनी काम पाहिले.
प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री प्रकाश राठोड, श्री गोमाजी चव्हाण, श्री व्यंकटराव उप्पे, श्री राठोड पी.एस., श्री निलेश भिलवडीकर, श्रीमती माया देवराव, श्रीमती माया देवतळे, श्रीमती सुनिता तोरणेकर, श्रीमती छाया रिठे, श्रीमती सुनिता माजळकर, श्रीमती सपना मंडारे, श्रीमती किर्ती वाढवे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विज्ञान शिक्षक श्री निलेश भिलवडीकर यांनी केले तर आभार श्री सुनिल निकम यांनी मानले.