एकाच वाहनावर दोन नंबरचा वापर करनार्या असलम बानानी वर मांडवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल,आरोपी ला दोन दिवसाची पोलीस कोठडी.
किनवट तालुका प्रतीनीधी
नांदेड जिल्याचा मांडवी पोलीस ठाण्याती सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.डी.शिवरकर व त्यांचे कर्मचारी गस्तीवर असतांना दि.०३ रोजी सारखनी मांडवी रोडवर वाहनांची तपासनी करीत असतांना सारखनी कडुन मांडवी कडे माल भरुन जात असलेल्या वाहन MH 26 AD 5924 वाहनाची तपासनी करीत असतांना याच वाहनावर MH 26 BC 5924 असे दोन बनावट पासींग क्रमांक दिसुन आल्याने सदर वाहन मांडवी पोलीस ठाण्यात लावुन प्राथमीक चौकशी करुन आरोपी असलम हमीद बानानी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असुन आरोपी असलम बानानी याला मा.न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठळी दिली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि मांडवी पोलीस ठाण्यात नव्याने रुजु झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.डी.शीवरकर यांनी मांडवी पोलीस ठाने हे तेलंगाना राज्याच्या सिमेवर असल्याने आपली पोलीस यंञना सज्ज ठेवत व कोवीळ १९ च्या काळात ये जा करनार्या वाहनांची तपासनी करुन अनेक वाहना कडुन दंड वसुन केला आहे. त्याच प्रमाणे दि.०३/०६/२०२१ रोजी सारखनी कडुन मांडवी कडे गजाळी व सामान भरुन येत असलेल्या फोर्स कंपणीचा मालवाहु पिकअप ज्याचा समोरुन असलेला वाहन क्रमांक 26 AD 5924 याला थांबवुन वाहनाच्या कागदपञाची चौकशी करीत असतांना त्याच वाहनाच्या पाठीमांगे MH 26 BC5924 असे दोन बनावट पासींग क्रमांक दिसुन आल्याने पोलीस चक्रावुन गेले त्यांनी लगेच सदर वाहनाला मांडवी पोलीस ठाण्यात लावुन सखोल चौकशी केली व वाहनाच्या मालकाला दि.०४/०६/२०२१ रोजी सकाळी ९-३० वाजता हजर राहुन एकाच वाहनावर दोन नंबर कसे याचा जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे नोटीस दिले, परंतु सारखनी येथील व्यापारी असलम हमीद बानानी याने पोलीसा समोर हजर होण्या एैवजी बाहेर गावी असल्याचे सांगत उडवा उडवीचे उत्तर दिले. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला कि सदर वाहन हे चोरीचे तर नाही ना ? तेव्हा मांडवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.डी.शिवरकर यांनी वेळ न गमावता आपले वरिष्ठ पोलीस अधीकारी मा.प्रमोद शेवाळे,जिल्हा पोलीस अधीक्षक व मा.विजय कबाडे अप्पर पोलीस अधीक्षक,व उप विभागीय पोलीस अधीकारी मा.विलास जाधव यांचे मार्गदशन घेवुन लगेच आपली संञना कामाला लावत दि.०४/०६/२०२१ रोजी ४ वाजताच्या सुमारास सारखनी येथे सापळा रचुन आरोपी असलम हमीद बानानी हे आपल्या घरात लपुन बसला होता त्याला मांडवी पोलीसांच्या टिम ने मोठ्या शिताफीने जेर बंद केले व दि.०४/०६/२०२१ रोजी पोलीस स्टेशन मांडवी येथे गु.र.न.६३/२१/ कलम ४२०,४६७,४६८,४७१, भादवी प्रमाणे वाहनाचे मालक असलम हमीद बाबनी वय ४० वर्ष व्यवसाय व्यापारी रा.सारखनी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन एकाच वाहनावर दोन बनावट क्रमांक कसे याच्या तपास कामी मा.न्यायालया समोर हाजर केले असता मा.न्यायालय माहुर यांनी आरोपी असलम बानानी याला दोन दिवसाची पोलीस कोठळी सुनावली असुन या प्रकरणाचा तपास गतीने सुरु असुन सदर वाहनाचे मॅकेनीक कडुन तपासनी केली असता या वाहनाच्या ईंजीनचा चा नंबर दिसुन येत नसल्याने सदर वाहन हे चोरी चे तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला असुन सदर वाहनाच्या तपास कामी आर.टी.ओ. कडुन अहवाल प्राप्त करनार असल्याचे सुञा कडुन समजले आहे.
असलम हमीद बानानी हा सारखनी येथे गुठखा तस्करी करीत असतांना गत वर्षी सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता,असलम बानानी सराईत गुटखा तस्कर असुन तो गुटखा तस्करी करण्या साठी वेग वेगळे नंबर बदलुन नजिकच्या तेलंगाना, विर्दभ राज्यात गुटखा तस्करी साठी या वाहनाचे वापर केले असावे असाही संशय पोलीसांना आहे.
या गंभीर प्रकरणात मांडवी पोलीस बारकाईने तपास करित असुन या प्रकरणचा दोन दिवसात पुर्ण तपास होनार नसुन पुठील तपासा साठी पुन्हा पोलीस कोठडीची वाढ होनार असल्याचे जानकारांचे मत आहे.
तसेच किनवट,माहुर,तालुक्यात अनेक लहान मोठ्या वाहनांच्या चोरीच्या घटना घडत आहेत हे ही वाहन चोरीची असल्याचा संशय पोलीसांचा आहे त्या दिशेने मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधीकारी मल्हार शीवरकर हे तपास करित आहे.