किनवट शहर अतिक्रमण मुक्ती व स्वच्छ करण्यासाठी सहकार्य करावे -मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव
किनवट/प्रतिनिधी: नगरपरिषदेच्या वतीने किनवट शहर सुंदर, स्वच्छ, नीटनेटके अतिक्रमण मुक्त करण्यासाठी तसेच शहराच्या विकासासाठी विविध उपाय योजना अमलात आणल्या जाणार आहेत. शहरातील नागरिकांनी आपले शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपण सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा नगरपालिकाचे मुख्य अधिकारी डॉक्टर मृणाल जाधव यांनी केले.
घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार नागरिकांनी आपल्या घरात निर्माण होणारा ओला, सुखा व घातक कचरा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत करून नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या घंटागाडीच्या मदतनिसाकडे द्यावा. तसेच शहरातील डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात निर्माण होणारा घातक कचरा घंटागाडी मदतनीस कडे न देता तो घातक कचरा त्यांनी नियुक्त केलेल्या एजन्सीकडेच द्यावा. शहरातील विविध आस्थापनाधारकांनी तसेच नागरिकांनीही प्लास्टिकचे कॅरीबॅग प्लास्टिकचा वापर व विक्री करू नये.
पाळीव प्राण्यांचे धारकांनी त्यांच्याकडील पाळीव प्राणी मोकाट रस्त्यावर सोडू नये. अन्यथा मोकाट जनावरे कोंडवाडा टाकून संबंधिता विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
आस्थापनाधारकाने सुखा कचरा संकलित करण्याकरिता निळ्या रंगाच्या डस्टबिल ओल्या कचऱ्याकरिता हिरव्या रंगाचा डस्टबिन चा तर लाल रंगाच्या डस्टबिनचा वापर घातक कचरा संकलित करण्याकरिता करावा. आपल्या अस्थापणे समोर कचरा संकलित करण्याकरिता वेगवेगळे रंगाच्या डस्टबिन ठेवाव्यात नगर परिषदेची विकासात्मक कार्य करण्यासाठी व नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुविधा पुरविण्याकरिता नागरिकांनी त्यांच्याकडे थकीत असलेला व चालू विविध स्वरूपाच्या करांचा भरणा नगर परिषदेकडे करून सहकार्य करावे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये किनवट शहरात उच्च नामांकित मिळून देण्याकरिता शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने, हॉटेलच्या आस्थापना धारकांनी व नागरिकांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवावा. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये स्वच्छ हॉटेल, शाळा, महाविद्यालय, दवाखाना यांची तपासणी होणार असून त्या अनुषंगाने शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार आपापले हॉटेल शाळा महाविद्यालय दवाखाना स्वच्छ व सुद्धा ठेवावे. शहरातील शाळा, महाविद्यालय व हॉस्पिटल यांची
स्वच्छतेबाबत स्वच्छ आस्थापना स्पर्धा 13 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. 24 व 25 जानेवारी या दोन दिवशी नगर परिषदे कडून या आस्थापनाची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान स्वच्छतेचे उल्लंघन झाल्याची आढळून आल्यास संबंधित आस्थापने विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर उत्कृष्ट स्वच्छता राखणाऱ्या आस्थापनाधारकांना नगरपरिषदेकडून बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन 26 जानेवारी रोजी येथे सन्मान करण्यात येणार आहे.
तरी या आस्थापनाधारकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन किनवट नगर परिषदेचे प्रशासन तथा मुख्याधिकारी डॉक्टर मृणाल जाधव यांनी केले आहे.