धनगर आक्रोश मेळाव्यास नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- अमन कुंडगीर
नांदेड जिल्हाप्रतिनिधी संजिवकुमार गायकवाड :धनगर समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी व रेंगाळलेल्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे धनगर आक्रोश मेळाव्याचे आयोजित केले आहे.
सदर मेळाव्याची हरसिद्धी माता मंदिर येथून सुरुवात होणार असून धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री माननीय खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वात होणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी तसेच महिला, युवक, युतीने या आक्रोश मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी आव्हान धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने अमान कुंडगीर यांनी केले आहे.
धनगर समाजाची गेले अनेक वर्षापासून एस.टी. आरक्षणाची मागणी प्रलंबितच आहे. 3000 कोटीच्या निधीचा केवळ गवगवा केला आहे त्याचबरोबर मेंढपाळाच्या आणि इतर अनेक प्रलंबित मागण्या पूर्णत्वास आलेल्या नाहीत त्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी उपस्थिती दर्शवून सरकारला आपली ताकद दाखवून द्यावी माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या नेतृत्वात धनगर समाजाच्या मागणीसाठी ते शासनासोबत पाठपुरावा करून आरक्षण मिळेपर्यंत लढणार आहेत. संपूर्ण सवलती लागू करा. राजकीय आरक्षण सोडा. परंतु जाहीर झालेल्या तीन हजार कोटी चा निधी अद्यापही समाजापर्यंत वितरित झालेला नाही.केवळ या निधीमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी व इतर प्रवेशासाठी ताब मिळाला परंतु घरकुल योजनेपासून अनेक जण वंचित आहेत तसेच मेंढपाळाच्या मागण्या सुद्धा अजूनही प्रलंबितच आहेत. धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा तर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे 6 नोव्हेंबर रोजी धनगर आक्रोश मेळावा ही आपली ताकद दाखविण्याची संधी आहे. त्यामुळे या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने अमन कुंडगीर यांनी केले आहे .