दुंड्रा येथिल शेकडो कार्यकर्त्याचा संभाजी ब्रिगेड मध्ये प्रवेश
माहूर प्रतिनिधी
माहूर : संभाजी ब्रिगेड व शिवसेनेच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड.मनोज दादा आखरे हे संबंध महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.ते नांदेड जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर माहूर येथे बैठकीसाठी आले असता त्यांच्या उपस्थित संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव समाधान उटकर यांच्या नेतृत्वाखाली दुंड्रा येथील
संतोष जैस्वाल,गणेश पोलसवार,संजय कदम,प्रशांत इंगोले,विशाल वरडपवार,संजय पलिकोंडावार,सुनील मेंड लावर,सोनु तोटावार,पवन येरडलावार,राजु मोगरे,दिनेश गेडाम,योगेश गेडाम,अकोष वेट्टी
प्रकाश आडे अशा शेकडो कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड या राजकिय पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रदेश संघटक तथा नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख उमाकांत उफाडे,लोकसभा अध्यक्ष संकेत पाटिल, जिल्हाध्यक्ष भगवान कदम, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे जिल्हा सचिव परमेश्वर पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बालाजी सिरसाट ,कमलेश कदम, प्रदीप गुब्रे,बालाजी पाटील सांगावीकर, संतोष पाटील,अंकुश कोल्हे, परमेश्वर खोसे,संभाजी ब्रिगेडचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष मंगेश जाधव किनवट तालुकाध्यक्ष सचिन कदम माहूर तालुकाध्यक्ष विशाल शिंदे विधानसभा अध्यक्ष शिवा पवार रितेश मंत्री आदी कार्यकर्ते उपस्थित होते.