मौ.वाघी येथील मातंग समाजातील इसमाचे अपहरण करून बेपत्ता केलेल्या आरोपी विरूद्ध तातडीने पोलीस कार्यवाही करावी!* *अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाची पोलिस अधिक्षक यांचेकडे केली मागणी!
नांदेड: मौ.वाघी ता.नांदेड येथील मातंग समाज हा तेथील जातीयवादी गावगुंडाच्या त्रासाने गेल्या वर्षभरापासुन दहशतीखाली व भितीखाली जगत आहे,याची शासन दरबारी व पोलीस यंत्रणा यांचेकडे वेळोवेळी लेखी निवेदने देवुन,धरणे आंदोलने करूनही मौ.वाघी येथील मातंग समाजास ना स्थैर्य मिळाले,ना न्याय!
अशा वातावरणात वाघी येथील समाज हा वाटचाल करित असतानाच मागे ऑगस्ट मध्ये मातंग समाजातील से.नि.कर्मचारी गंगाधर गणपती खुणे याना,त्याच गावातील उच्चवर्णीय व्यक्ती हिरामन लोभाजी धरमले,व अनिकेत धरमले यानी केवळ जातीयवादी मानसिकतेतुन जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे, यांचे विरूद्ध लिंबगाव पोलिस स्टेशन अंतर्गत अँट्रॉसिटी अँक्ट प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता.अँट्रॉसिटी अँक्टला निष्प्रभ करण्यासाठी गंगाधर खुने आणि इतर चार-पाच महिला,पुरूष यांचे विरूद्ध कलम 395 अंतर्गत दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले!
या दरम्यानच मौ.वाघी येथील रहिवाशी मातंग व्यक्ती शिवाजी मारोती खुणे यानाही ,त्याच गावातील 6-7 उच्चवर्णीय व्यक्ती नी जातीयवादी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी ही दिली आणि त्याच दिवसापासून मातंग व्यक्ती शिवाजी मारोती खुणे हा बेपत्ता आहे, या घटनेस आज जवळपास 20 दिवसाचा कालवधी लोटलेला आहे
अपहरीत बेपत्ता माझा पती हा स्वतः हुन कुठेही निघुन गेलेला नाही तर त्यास बेपत्ता गावातील उच्चवर्णीय व्यक्ती नीच केलेले आहे, त्यांचे विरूद्ध पोलीस कार्यवाही करण्यात यावी व माझ्या पतीचा शोध घेवुन त्यास सुखरूप घरी पोहचवावे,ही कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणारे संबंधित PI,API,बीट जमादार याना सेवेतुन निलंबीत करण्यात यावे,तद्वतच,मौ.वाघी येथील मातंग समाजातील महिला,पुरूष यांचे विरूद्ध दाखल खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे,अशा मागण्या घेवुन अपहरीत बेपत्ता व्यक्ती शिवाजी मारोती खुणे यांची पत्नी धुरपताबाई मारोती खुणे यानी अशा स्वरूपाची लेखी निवेदने लिंबगाव पोलिस स्टेशन, पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी, नांदेड व सर्व सबंधिताना देवुनही,कुठल्याही प्रकारची दखल घेऊन कार्यवाही होत नसल्याने, या अन्यायी गंभीर घटनेकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व न्यायाच्या अपेक्षेने गेल्या 15 दिवसापासून मा.जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड समोर मौ.वाघी येथील समाज बंधु-भगिनी समवेत साखळी उपोषण करित आहेत*
मौ.वाघी येथील मातंग समाजातील महिला, पुरूष यानी सुरू केलेले आंदोलनाची 15 दिवस लोटुन गेल्या नंतरही कसल्याही प्रकारची दखल जिल्हा प्रशासन गांर्भीयाने घेत नाही, फक्त कागदी घोडे पुढे सरकावीत चाल -ढकल होत असल्याची बाब “अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या ” पदाधिकारी यानी आंदोलन स्थळी भेट घेवुन पिडीत महिला-पुरूष यांचेशी चर्चा केल्यानंतर लक्षात आली!
मौ.वाघी ता. नांदेड येथील मातंग समाजावर होत असलेला अन्याय,गुन्हेगारीचा वेळीच कायदेशिर बंदोबस्त करत कार्यवाही करण्यास होत असलेली टाळाटाळ, या उलट मातंग समाजातील महिला आणि पुरूष यांचे विरूद्ध मात्र तत्परतेने नोंदवलेले खोटे गुन्हे, आरोपी ना तांत्रिक बाबीची अधार घेत पाठीशी घालणे आदि बाबी घेवुन,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक-अध्यक्ष सतिश कावडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज दिनांक:16 सप्टेंबर 2022 रोजी नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.प्रमोद शेवाळे साहेब यांची पोलिस मुख्यालयात समक्ष भेट घेवुन सविस्तर चर्चा करून योग्य ती कार्यवाही चे आदेश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत,अशा अशयाचे निवेदन देण्यात आले
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या वतीने मा.पोलिस अधिक्षक साहेब याना भेटलेल्या शिष्टमंडळात माझ्या सह उत्तम बाबळे,परमेश्वर बंडेवार,चंपतराव हातागळे,एन.डी.रोडे,शिवाजी नुरूंदे, नागेश तादलापुरकर, एच.बी.बोरगावकर आदिसमवेत मौ.वाघी येथील गजानन खुणे,रमेश गायकवाड, धुरपताबाई मारोती खुणे, धर्माजी खुणे,बालाजी भोसले,संतोष दस्तके,गंगाधर खुणे,शितलाबाई गजले,गयाबाई गायकवाड, शोभाबाई खुणे,शुषेलाबाई खुने,उद्धव गायकवाड आदि महिला-पुरूष हजर होते!