एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू;आ.भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन
किनवट/प्रतिनिधी: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 15/10/2022 ते 17/10/2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या असून आज दिनांक 17 रोजी किनवट व माहुर मतदार संघाचे विद्यमान माननिय आमदार भिमराव केराम साहेब यांच्या हस्ते शासकीय आश्रम शाळा किनवट येथे प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी मा. श्री आत्माराम धाबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घटन समारंभास नगराध्यक्ष श्री आनंद मच्छेवार, गटशिक्षणाधिकारी श्री अनिल महामूने, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री.मनोज घडसिंग,तालुका क्रिडा अधिकारी श्री.अनिल बंदेल,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. नागनाथ कराड, श्री निळकंठ कातले विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी किनवट प्रकल्पातील शासकीय ,अनुदानित व एकलव्य निवासी अशा एकूण 38 शाळांमधील 1007 विद्यार्थी सहभागी झाले असून यामध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व वैयक्तिक मैदानी क्रिडाप्रकारात विद्यार्थी आपापल्या केंद्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी नियोजन अधिकारी श्री. शंकर साबरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.सुनिल पाईकराव, स. ले. अ. श्री दयानंद शिनगारे, कार्यालय अधीक्षक श्री अनिल कवडे, सहायक प्रकल्प अधिकारी(शिक्षण) श्री मनोज टिळे, श्री.माधव देशमुखे,श्री.संजय पुरी यांनी प्रयत्न केले तर सूत्रसंचालन श्री. नागनाथ भुरके क्रीडा शिक्षक संदीप प्रल्हाद येशिमोड यांनी केले.