किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत जाहीर

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रक्रियेसाठी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. सोडतीचे निकाल पुढील प्रमाणे आहे.

माहूर तालुक्यात लखमापूर अनुसूचित जमाती, वाई बा. अनुसूचित जाती, वानोळा सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. किनवट तालुक्यातील सारखणी सर्वसाधारण, मांडवी सर्वसाधारण, मोहपूर अनुसूचित जाती (महिला), गोकुंदा अनुसूचित जाती (महिला), बोधडी बु. अनुसूचित जाती, जलधारा सर्वसाधारण, इस्लापूर अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरंजणी सर्वसाधारण महिला, सरसम बु. सर्वसाधारण महिला, दुधड अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हदगाव तालुक्यातील निवघा बा. सर्वसाधारण महिला, रुई धा. सर्वसाधारण महिला, पळसा सर्वसाधारण, कोळी सर्वसाधारण महिला, मनाठा ना. मा. प्र. (महिला), तामसा सर्वसाधारण, आष्टी ना. मा. प्र. साठी आरक्षण जाहीर झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील लहान अनुसूचित जमाती (महिला), येळेगाव सर्वसाधारण, मालेगाव ना.मा. प्र साठी आरक्षण जाहीर झाले आहे. नांदेड तालुक्यातील वाजेगाव ना.मा.प्र (महिला), वाडी बु. सर्वसाधारण, लिंबगाव सर्वसाधारण, धनेगाव ना.मा.प्र. (महिला), बळीरामपूर सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुदखेड तालुक्यातील बारड सर्वसाधारण, मुगट सर्वसाधारण, माळकौठा सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. भोकर तालुक्यात पाळज सर्वसाधारण (महिला), भोसी अनुसूचित जाती (महिला), पिंपळढव अनुसूचित जाती (महिला)साठी आरक्षण जाहीर झाले आहे. उमरी तालुक्यातील गोरठा सर्वसाधारण (महिला), तळेगाव अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली सर्वसाधारण महिला, येताळ सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे. बिलोली तालुक्यातील आरळी अनुसूचित जमाती (महिला), सगरोळी सर्वसाधारण, रामतीर्थ ना.मा.प्र., लोहगाव सर्वसाधारण (महिला)साठी आरक्षण जाहीर झाले आहे. नायगाव खै. तालुक्यातील बरबडा ना.मा.प्र. (महिला), कुंटूर ना.मा.प्र., देगाव अनुसूचित जमाती, मांजरम ना.मा.प्र., नरसी सर्वधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे. लोहा तालुक्यातील सोनखेड अनुसूचित जाती, वडेपुरी अनुसूचित जाती (महिला), उमरा ना.मा.प्र. (महिला), कलंबर अनुसूचित जाती, सावरगाव अनुसूचित जाती, माळाकोळी ना.मा.प्र.साठी आरक्षण जाहीर झाले आहे. कंधार तालुक्यातील शिराढोण ना.मा.प्र. (महिला), कौठा सर्वसाधारण, बहाद्दरपुरा अनुसूचित जाती (महिला), फुलवळ सर्वसाधारण (महिला), पेठवडज सर्वसाधारण (महिला), गौळ अनुसूचित जाती (महिला), कुरूळा सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुखेड तालुक्यातील जांब बु. ना.मा.प्र., चांडोळा सर्वसाधारण, एकलारा ना.मा.प्र. (महिला), येवती सर्वसाधारण (महिला), सावरगाव पी. अनुसूचित जाती (महिला), बाऱ्हाळी सर्वसाधारण, दापका गु. सर्वसाधारण (महिला), मुक्रामाबाद ना.मा.प्र. (महिला)साठी आरक्षण जाहीर झाले आहे. देगलूर तालुक्यातील खानापूर सर्वसाधारण, शहापूर सर्वसाधारण, करडखेड अनुसूचित जमाती (महिला), मरखेल सर्वसाधारण (महिला), हानेगाव सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे.
00000

278 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.