शेतकरी रस्त्यावर करत असलेल्या ठिग व खळ्यामुळे रस्ते अपघात वाढ
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.14.जिल्ह्यामधील अनेक शेतकरी काढणीला आलेले मूग,उडीद आणि सोयाबीन हे पिके मुख्य रस्त्यावर आणून खळे करत आहेत,तर अनेक शेतकरी ओले झालेले सोयाबीन मुख्य रस्त्यावर आणून वाळू घालत आहेत,त्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या अनेक दुचाकी गाड्या चालवणाऱ्या दुचाकी स्वरांचे तालुक्या मध्ये मोठ्या प्रमाणावर अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यावर हल्लर द्वारे खळे करणाऱ्या व सोयाबीन वाळवणाऱ्या व रात्री रस्त्यावर मोठ मोठे ढीग लावून भवतालं दगड ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन जप्त करून त्यांच्यावर अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.
दरवर्षी अनेक शेतकरी वाहन धारकाला त्रास होईल या उद्देशाने जाणीवपूर्वक मुख्य रस्त्यावर विनापरवानगी खळे करत आहेत, त्यामुळेच दररोज अपघात घडत आहेत,याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे,
परवा धर्माबाद तालुक्यातील मौजे बन्नाली येथील सरपंच प्रतिनिधी भोकर येथून आपल्या दुचाकीवर जन्म भूमी ते क्रम भूमी या रस्त्याने सायंकाळी 7:40 ते 8:20 मिनिटांच्या दरम्यान बाभूळगाव ते येताळा रोडवर सोयाबीन चा ढीग दिसला नसल्याने त्यांची गाडी घसरून त्यांना तोंडाला,डोक्याला, गुडघ्याला जबर मार लागला असून त्यांच्या वर नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालू आहेत तसेच याचं तालुक्यातील धर्माबाद ते कंदकुर्ती रोड वर अजयरत्न सोनट्टके यांचा पण असाच अपघात होऊन त्याचा मूत्यू झाला असून त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा एक मुलगी वडील दोन बहिणी असा परिवार आहे.
भोकर तालुक्यातील नागापूर येथील विद्यमान उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते श्री,बालाजी पाटील शानमवाड हे नायगाव तालुक्यातुन पाहुण्यांना भेटून भोकरकडे परत येत असताना सायंकाली 6 वाजताच्या सुमारास एका शेतकऱ्याने रस्त्यावर वाळू घातलेल्या सोयाबीन वरून गाडी घसरली आणि ते खाली पडले, त्यात त्यांच्या उजवा खांद्याचे आणि उजव्या पायाच्या टोंगळ्याचे हाड मोडले,ईतर वाहन धारकांनी त्यांना तातडीची मदत केली,दैवबलवत्तर होते म्हणून यांचा जिव थोडक्यात बचावला,
त्यांच्या खांद्यावर नांदेड येथील खाजगी दवाखान्यात शस्त्रक्रिया करावी लागली,आता असा वाईट प्रसंग कोणत्याच वाहन धारकावर येऊ नये म्हणून,सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ मुख्य रस्त्यावर आणि राज्य रस्त्यावर खळे करून वाळू घातलेले सोयाबीन कोणाचा जीव जाण्याअगोदर भरून नेऊन शेतकऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत.