*डॉ. अंकुश गोतावळे यांना मुंबई येथे ‘समाजभुषण पुरस्काराने’ सन्मानित*
जिवती,-२५-
*ठाणे महानगर पालिका यांच्यासंयुक्त वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे उत्सव समिती ठाणे च्या वतीने दर वर्षी जयंती निमित्त महाराष्ट्रातील चळवळीत सक्रिय योगदान देणाऱ्या कार्यकर्ते,नेते, साहित्यिक,विचारवंत , यांचा समाजभूषण पुरस्काराणे सन्मान करण्यात येतो.*
यावर्षी डॉ अंकुश गोतावळे यांनी मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय राहून लेखन, प्रबोधन, समन्वय, आंदोलन अशा विविध आघाड्यावर काम करून समाजिक विषयांना न्यायाप्रत घेऊन जाण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आर्टी ची निर्मिती, आरक्षण उपवर्गीकरण चळवळ, सुप्रीम कोर्टातील लढा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई येथील स्मारक, क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचे मुंबई येथील स्मारक यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्याची दखल घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा दि 25/8/2024 ला श्री. राम गणेश गडकरी रंगायतण ठाणे मुंबई येथे डॉ अण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्री सचिनभाऊ साठे श्रीमती कुसुमताई गोपले,मा.खासदार श्री नरेश मस्के, मा. आमदार श्री निरंजन डावखरे साहेब तसेच श्री पाटोळे साहेब उपायुक्त ठाणे महानगरपालिका आणि इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे.महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती सारख्या डोंगराळ आदिवासी दुर्गम ठिकाणी राहून संपूर्ण महाराष्ट्रात काम करणाऱ्या डॉ अंकुश गोतावळे सारख्या एका सामान्य माणसाची दखल घेऊन मुंबई येथे सन्मानित केल्याबद्दल चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून आनंद व्यक्त करून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.