अशोक माध्यमिक विद्यालय पळशी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
किनवट/प्रतिनिधी: क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा समिती यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष 2024/ 25 मधील पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेतील 14 17 19 वर्षाखालील मुलांन करिता क्रिकेट स्पर्धा दिनांक 26 ऑगस्ट रोजी एम एस पी एम संस्थेचे अशोक माध्यमिक विद्यालय,पाळशीच्या भव्य क्रीडांगणावर उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली.
सदर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व नांदेड जिल्हा शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य रमेश राहुलवार , उद्घाटक म्हणून तालुका संयोजक संदीप एसीमोड तर प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील मुख्याध्यापक डॉक्टर वसंत राठोड, किशोर पवार, राजेंद्र चौधरी, निखिल कनाके, दिनकर शेंडे,प्रभाकर दसरवार तसेच तालुक्यातील क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक एरडलावार, प्राध्यापक फरहान, तांदळे सर प्राध्यापक रमणराव, प्राध्यापक इंदुरे, शेषराव राठोड, अन्वर चव्हाण, गोपाल तुंमालवाड, अमोल विश्वास पाटील, आकाश राठोड पत्रकार संदेश पाटील व एम एस पी एम चे सर्व शिक्षक शिक्षक कत्तर कर्मचारी उपस्थित होते.
दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील 14 वर्षे वयोगटातील 16 संघ 17 वर्षे वयोगटातील 16 संघ 19 गटातील आठ संघाने सहभाग नोंदविला या स्पर्धेत 14 वयोगटात व 17 वयोगटात आश्रम शाळा पळशी तांडा व 19 वर्षे वयोगटात एस एन ज्युनियर कॉलेज पळशी या संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पात्र ठरले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेल्या खेळाडूंना संस्थेचे सचिव नवीन राठोड, अध्यक्ष सुनील राठोड, कोषाध्यक्ष जयश्री राठोड, तहसीलदार मॅडम, गटशिक्षणाधिकारी बने साहेब, विस्तार अधिकारी गंगाधर राठोड व पालक यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय करिता शुभेच्छा दिल्या.