तीर्थक्षेत्र माहूर येथिल कैलास टेकडीवर दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या महाप्रसादाची किनवट येथिल स्वामी प्रापर्टीज आणि साईराम बिल्डींग मटेरिअलच्या संयुक्त सौजन्याने अमावस्या आणि पोळा सणाचे औचित्य साधून व्यवस्था
किनवट/प्रतिनिधी- तीर्थक्षेत्र माहूर येथिल कैलास टेकडीवर दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या महाप्रसादाची किनवट येथिल स्वामी प्रापर्टीज आणि साईराम बिल्डींग मटेरिअलच्या संयुक्त सौजन्याने अमावस्या आणि पोळा सणाचे औचित्य साधून व्यवस्था करण्यात आल्याचे संयोजकांनी कळविले आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस असल्याने या महाप्रसादाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.
रविवार दि.१ सप्टेंबरच्या उत्तर रात्री ५.२१ वाजता अमावस्येला सुरुवात होत आहे. २ सप्टेंबरला परिपूर्ण सोमवती दर्श अमावस्या असून ३ सप्टेंबरच्या सकाळी ७.२४ वाजता अमावस्या समाप्त होत आहे. सोमवती अमावस्येला कैलास टेकडीवर हजारो भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी असणार आहे. त्याचे औचित्य साधून किनवट येथिल स्वामी प्रापर्टीज आणि साईराम बिल्डींग मटेरिअल या प्रतिष्ठाणच्या वतीने भाविकांच्या महाप्रसादासाठी सोमवारी ७ वाजल्यापासूनच सुरुवात होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.