किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान* *पोलीस अधिक्षक विजय मगर यांनी तातडीने केली मदत

नागपूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांना वृद्ध महिलेची घटना समजताच तात्काळ पोलीस अधीक्षक यांना फोन करून सदर वृद्ध महिलेला जीवदान दिले आहे.

सविस्तर वृत्त असे की, वार्ताहर चंद्रशेखर गुरनुलेरे यांना वनाथ चौरे कॉलेज, बोरुजवाडा येथे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होण्यासाठी जातांना रेवनाथ चौरे कॉलेजच्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला एक वृद्ध महिला वय साधारण ७० वर्ष बसलेल्याअवस्थेत आढळली. ती एकाच जागेवर छत्री घेऊन बसलेली होती, चौकशी केल्यावर कळलं की ती मुळची उमरेडला राहणारी, तिच्या मुलांनी तिला तीन दिवसा आधी इथे आणून सोडले ती पूर्णपणे घाबरलेली होती पायांची अवस्था फार वाईट होती, मानसिक स्थिती बरोबर नव्हती परिस्थितीची गंभीरता लक्ष्यात घेता, वार्ताहर चंद्रशेखर गुरनुले यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांना संपर्क साधला व व्हिडिओ बनवून पाठवला. त्यानंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांनी तात्काळ एस.पी. मगर यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी जातीने लक्ष देत सावनेर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. मुळक यांना आदेश दिलेत. पी.एस. आय. मुळक फोन करून संपूर्ण घटनेची माहिती घेतली व लागलीच त्यांनीही मदत केली. सावनेर परिसरात समाज सेवेकरिता प्रसिद्ध असलेले हितेश बनसोड यांच्याशी सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुळक यांनी संपर्क साधला व त्यांनी आपल्या यंत्रणेला लागलीच कामाला लावले व वृद्ध महिलेला घेण्याकरिता हितेश बनसोड आपले वाहन घेऊन घटना स्थळी पोहचले. वृद्ध महिलेवर वैद्यकीय उपचार करण्याकरीता सावनेर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांच्या चौकशी नंतर तिने तिचे नाव विठाबाई गोपाळराव ठाकणे, वय ७० वर्ष राहणार उमरेड असे सांगितले. वृद्ध महिलेचे कपडे फाटलेले व भिजलेले होते स्वतः सावनेर पोलीस स्टेशन माणुसकीची वागणूक देत तिची काळजी घेतली व तिच्याकरिता नवीन कपडे, जेवणाची व्यवस्था करून दिली. डॉक्टर यांनी तपासल्यावर बी.पी. व शुगर कमी असल्याचे सांगितले, व त्यांनी योग्य ते उपचार केले.

उपचारानंतर वृद्ध महिलेला सावनेर शासकीय रुग्णालयातून हितेश बनसोड व सावनेर पोलीस स्टेशनचे हवालदार यादव यांनी खापरखेडा येथील संजीवनीमाला या वृद्धाश्रमात हलवले. यात एस. पी. मगर, पी.एस. आय. मूळक, हवालदार यादव, हितेश बनसोड, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

145 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.