किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रत्येकांनी आई-वडिलांची सेवा करावी..हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.२२.आईवडीलांचे स्थान हे जिवनात अतिशय महत्त्वाचे असून त्यांची सेवा करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य.. हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर

लोहा तालुक्यातील पारडी येथे (दि.)२१.डिसेंबर २०२३ रोजी कै.पांडुरंग पाटील पवार यांच्या स्मरणार्थ श्री हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर यांचा हरिकिर्तनाचा व गोडजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी श्री हभप शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर म्हणाले की,आई वडीलांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे.प्रत्येकांने आपल्या आई वडीलांची सेवा करावी.ईश्वराचे नाम घ्यावे.यावेळी संपुर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजरात,पांडुरंगाच्या नामस्मरणात किर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध होऊन गेला. हरि किर्तनाच्या कार्यक्रमानंतर गोडजेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण,शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, शिवसेनेचे संघटक एकनाथ दादा पवार,माजी नगराध्यक्ष सौ आशाताई रोहिदास चव्हाण, माजी जि प सदस्य विठ्ठलराव शेटकर,जि प सदस्य प्र.रंगनाथ राव भुजबळ, जिल्हा नियोजन समिती सदस्य नवनाथ (बापूसाहेब)रोहिदास चव्हाण,माजी सरपंच दिगांबर पाटील डिकळे,डी टी महामुने,शिवा संघटना उपाध्यक्ष साधू पाटील वडजे,सरपंच रामेश्वर पाटील,माजी सरपंच भिमराव पाटील शिंदे,व्हा.चेअरमन शिवाजी पाटील बुद्रुक,जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे,साहेबराव सोनकांबळे, बापू गायकर,संजय कहाळेकर,मोहन पाटील पवार,पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास सावळे,रमेश पाटील पवार,शिवराज दाढेल,प्रेस फोटोग्राफर विनोद महाबळे,
टि के.दाढेल,सुलतान शेख,प्रदिप हटकर,दशरथ लिंबोटकर,माधव वंजारे,विनायक सेवनकर,विलास राठोड परिसरातील सरपंच,उपसरपंच,माजी सरपंच,चेअरमन,कै.पांडुरंग पाटील पवार यांचे सुपूत्र शिवराज पाटील पवार,भगवान पाटील पवार,गणेश पाटील पवार,पुतणे बालाजी संभाजी पाटील पवार,नातू गोविंद आनंदा पवार,नातेवाईक यांच्यासह तालुक्यातील व पारडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

173 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.