अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयाचा निधी देणार- आ.बालाजी कल्याणकर । पुतळा समितीचे अध्यक्ष भारत खडसे यांच्या प्रयत्नांना यश
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.5.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी ५० लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे नांदेड उत्तरचे आ.बालाजी कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. ते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळा परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी महापौर सौ.जयश्री पावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यानंतर जिल्हा जयंती मंडळाच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,आ.अमरनाथ राजूरकर,आ.बालाजीराव कल्याणकर,आ.श्यामसुंदर शिंदे, आ. मोहनअण्णा हंबर्डे,आ.राम पाटील रातोळीकर,माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत,मा.आ. अविनाश घाटे,आंबेडकरी नेते सुरेशदादा गायकवाड,माजी जि.प.अध्यक्ष आनंद गुंडीले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले,मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार,ऍड. सुरेंद्र घोडजकर,माजी सनदी अधिकारी व्ही.जे. वरवंटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शामराव कदम,शिवसेनेचे प्रकाश मारावार,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे आदींनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात प्रा.बालाजीराव थोटवे,प्रा.डॉ.माधव बसवंते व प्रा.सदाशिव भुयारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.याप्रसंगी आंबेडकरी नेते सुरेश दादा गायकवाड यांनी पुतळा उभारणी संदर्भात भारत खडसे यांनी उभारलेल्या लढ्याची आठवण काढून समाजाला प्रेरणा देण्यासाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणीकरीता भारत खडसे यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याचे सांगितले.
नांदेड शहरातील अनेक भागातून अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्र वाहनावरुन लावून भव्य मिरवणूका काढण्यात आल्या होत्या.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे,कार्यकारी अभियंता प्रकाश कांबळे,बाशेट्टी,सहाय्यक आयुक्त मिर्झा बेग,कार्यकारी अभियंता गिरीश कदम यांच्यासह जयंती मंडळाचे संयोजक तथा अध्यक्ष भारत खडसे,उपाध्यक्ष सचिन वाघमारे,सचिव ईश्वरअण्णा जाधव,स्वागताध्यक्ष बालाजी वाघमारे,संघटक शशीकांत तादलापूरकर,उमाजी रेड्डी,सोनाजी वाघमारे,विठ्ठल बोरीकर, नागेश तादलापूरकर, साहेबराव गजभारे,सचिन वाघमारे,किरण खडसे,आनंद बसवंते,श्रीदत्त घोडजकर,संतोष रणबावळे यांच्यासह सामाजिक, राजकीय,पत्रकार,डॉक्टर व सर्व पक्ष,संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत