स्वाधार शिष्यवृत्तीसाठी सीटू मजदूर युनियनचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांनी घेतली सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांची भेट
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.5.राज्य सरकारच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्तीची योजना मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुरू केली आहे.ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही व भाड्याने खोली करून शिक्षणासाठी राहावे लागले आहे.
अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना साधारणता वार्षिक साठ हजार रुपये समाज कल्याण विभागामार्फत दिले जातात. परंतु मागील पाच ते सहा वर्षापूर्वी शैक्षणिक वर्षात गुण कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरील योजनेचा लाभ नाकारण्यात येत होता.तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना देखील लाभ न देण्याच्या उद्देशाने अपात्र ठरविले जात होते. परंतु सीटू सलग्न मजदूर युनियनच्या वतीने दिनांक ३० जून ते एक जुलै रोजी समाज कल्याण कार्यालयापुढे ह्या जाचक अटी रद्द कराव्यात म्हणून समाज कल्याण कार्यालयापुढे आंदोलन केले आहे.
तेव्हा काही मागण्यांची पूर्तता सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ.तेजस माळवतकर यांनी केली होती.राहिलेल्या मागण्या देखील तातडीने सोडविण्यात याव्यात व अर्जदार विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ द्यावा म्हणून दि.५ऑगस्ट रोजी पासून बेमुदत्त ठिय्या आंदोलन सिटू संलग्न मजदूर युनियन करणार होती. परंतु डॉ.माळवतकर यांनी पालक विद्यार्थी व युनियनच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या कक्षामध्ये बोलावून घेतले व सकारात्मक निर्णय घेऊन सर्वच पात्र विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच १७ ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करणार असल्याचे देखील माळवतकर म्हणाले.
त्यालेखी आश्वासनामुळे होणारे बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
सहाय्यक समाज कल्याण आयुक्त डॉ.माळवतकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये सिटूचे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.श्याम सरोदे,कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.जयराज गायकवाड, कॉ.दिलीप कंधारे,कॉ.गंगाधर खुणे, कॉ.सोनाजी कांबळे, कॉ.सचिन वाहुळकर, कॉ.सुभाषचंद्र गजभारे, कॉ.सोमाजी सरोदे,कॉ.ओम सरोदे, कॉ.गणेश सोनटक्के, कॉ.सचिन सरोदे,विशाल कंधारे वीर गाडेकर आदींसह अनेक पालक विद्यार्थी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.