किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

ऑटोरिक्षातून सागवान कटसाईज नेताना सागवान व ऑटोरिक्षा जप्त; किनवट वनविभागा च्या पथकाला यश

किनवट ( प्रतिनिधी ) – आॅटोरिक्षातून सागवान कटसाईज लाकूड किनवट शहराकडे येत असल्याची खबर वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना मिळाल्यावरुन नाकेबंदी करण्यात आली. तरीसुद्धा हुलकावणी देऊन पसार होणार्‍या आॅटोला कोठरी गोकुंदा रोडवर पकडण्यात वनविभागा च्या पथकाला यश आले . सदरील घटना ३० जुलै रात्री 9.30 वा. ची असून वनगुन्ह्याची नोंद करुन कार्यवाही करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी पि .एल. राठोड यांनी कळवले आहे.
आॅटोरिक्षातून सागवान कटसाईज लाकूड घेऊन जात असल्याची वनप्रशासनाला खबर मिळाली. उपवनसंरक्षक वाबळे आणि सहाय्यक वनसंरक्षक गिरी यांच्या मार्गदशनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पि . एल . राठोड यांनी नाकाबंदी केली. कोठारी गोकुंदा रोडवर वनकर्मचारी दबा धरून बसले असता किंनवटच्या दिशेने येणारा संशयित आटोला थांबवण्याचा इशारा केला असता ऑटो पसार होण्याच्या प्रयत्न करत असताना सर्व वनकर्मचार्यांनी ऑटोचा पाठलाग करून तो पकडण्यात यश मिळवले
तद्नंतर लगेच 1 तासाच्या अंतराने त्याच रोडवर पेट्रोलिंग करत असताना एक विना नंबरच्या मोटरसायकल वर अवैध सागी कटसाईज नग मोटरसायकल सह जप्त करण्यात वनविभागच्या पथकाला यश मिळाले परंतु या दोन्ही दोन्ही कार्यवाही मधील आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले .दोन्ही घटनांत
जप्त केलेला माल अंदाजे किंमत 19500 रुपये ऑटो व मोटरसायकल किंमत अंदाजे 45000 असा एकूण 64500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले आहे.
या कार्यवाहीत स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एल.राठोड , वनपाल चिखली एम.एन.कत्तूलवार , एस.एम.कोंपलवार ,बी.एस.संतवाले, जी टी माझळकर , वनरक्षक एस.एम .वैद्य , घायाळ ,चिभडे, रवी दांडेगावकर , एम.जे. गंगलवाड वनमजूर शेख नूर मामु व वाहनचालक बाळकृष्ण आवले यांचा सक्रीय सहभाग होता .

240 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.