किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कृषि संजीवनी मोहीमेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.22.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 25 जुन ते 1 जुलै या कालावधीत कृषि संजीवनी मोहीम राबविली जाणार आहे.या मोहिमेत विविध उपक्रम,विविध दिन साजरे करण्यात येणार आहेत. या मोहिमेदरम्यान शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बि.चलवदे यांनी केले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमातर्गंत कृषि संजीवनी मोहीमेचे आयोजन केले आहे. 25 जुन ते 1 जुलै दरम्यान हा खरीप हंगाम पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत या मोहिमेद्वारे कृषि विभागाचे अधिकारी,कर्मचारी,कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नवीन तंत्रज्ञानांचा प्रचार व प्रसार करताना शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानांचा अवलंब करावा यासाठी प्रयत्न करणार आहेत.

गाव,तालुका आणि जिल्हानिहाय नियोजनाचा आराखडा तसेच केलेल्या प्रचार व प्रसाराची नोंद केली जाणार आहे.

25 जुन रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मुल्यसाखळी बळकटीकरण दि.26 जुन रोजी पौष्टिक तृणधान्य दि.27 जुन रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दि.28 जुन रोजी खत बचत दिन,29 जुन रोजी प्रगतशील शेतकरी संवाद दि.30 जुन रोजी शेतीपूरक व्यवसाय दिन व 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार असून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत गाव बैठका, शिवार भेटीचे व शेतीशाळाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसोबत गावात कृषिविषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देण्यात येणार आहेत.

या मोहीम कालावधीत दररोज ऑनलाईन चर्चासत्र, मार्गदर्शनपर व्याख्याने इत्यादी आयोजित करण्यात येणार आहेत असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

126 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.