चिखली बु. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस . या तासभर झालेल्या पावसाने नाल्याला पूर येऊन पुराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात शिरून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान
किनवट ( प्रतिनिधी) : आज दिनांक 21 जून रोजी दुपारी 3=00 वाजताच्या दरम्यान चिखली बु. परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या तासभर झालेल्या पावसाने नाल्याला पूर येऊन पुराचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात शिरून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. हा नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य शेख जाफर चिखलीकर यांनी केली आहे.
किनवट तालुक्यातील चिखली बुद्रुक परिसरामध्ये आज दुपारी तीन वाजता पासून तासभर मोठा पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्याला पहिलाच पूर आला. किनवट ते नांदेड हा 161A हा महामार्ग जातो. या मार्गावर चिखली बु. बस स्थानकाच्या काही अंतरावर चिखली खुर्द येथील शेतकऱ्याची शेती आहे. या शेती जवळ या मार्गावरील पूल आहे. या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे या पुलाचे काम उन्हाळ्यामध्ये नुकतेच पूर्ण झाले होते. या कामासाठी संबंधित गुत्तेदार आणि पुलाच्या बाजूला वळण रस्ता तयार केला होता. हा रस्ता पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा नाल्यावर जसाच्या तसाच ठेवल्यामुळे आलेल्या पावसाळ्याच्या पहिल्या पुरात पाण्याचा प्रवाह नाल्याच्या मूळ मार्गावर न जाता तो चिखली खु येथील शेतकर केशव बळीराम खूपसे,चंपत परसराम खूपसे, पंडित परसराम खूपसे, भगवान खूपसे, माधव बळीराम खूपसे,आनंदराव खूपसे,संगीता राजू झळके यांच्या शेतातून गेला, त्यामुळे या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. या पुराच्या पाण्यामुळे शेती खरडून जाऊन शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीस मुख्यता या रस्त्याचे काम करणारी गुत्तेराची यंत्रणा कारणीभूत आहे .त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेख जाफर चिखलीकर यांनी केली आहे.