ना. संजय राठोड आणि मा.चंद्रकांत काळुराम पवार कडून शाहीर दौलत राठोड यास आर्थिक मदत.
किनवट: गतकाळातील विस, पंचवीस वर्षापासून शाहीर दौलत राठोड यांने अतिशय मनभावन असे समाजाचे सांस्कृतिक, जनजागरण विषयक वैचारिक, प्रबोधनात्मक मनोरंजन केले आहे. आपल्या सुरेल, पहाडी ,गोड, मधुर आवाजाने जनसामान्यांची मने जिंकली. हा सर्व जीवनाचा अटापीटा करीत असतांना तो दोन्ही पायाने अधु, अपंग व पंगू झाला.
अभाळा येवढे नैराश्य पदरी पडलेले असतांही त्यावर मात करून तो आपल्या चिला पिलांची खळगी भरू लागला. परंतू मागील वर्षांपासून जशी कोरोनाची लाट आली तशी त्याच्या घर संसाराची ससेहोलपट सुरु झाली. त्याच्या उपासमारीच्या अवकळा सुरु झाल्या.
शाहीरांची केविलवाणी अवस्था पाहून मागच्या वर्षी माझ्याकडून मदतीचे आवाहन करण्यात आले. शाहीरांच्या हाकेला हो देऊन अनेक दानशूरांनी आर्थिक मदत केली. काही प्रेमी लोकांनी अन्नधान्याचा सुद्धा पुरवठा केला. आजही कमी जास्त प्रमाणात त्याचे चाहते मदत करीत असतात.
त्याच हाकेला हो देऊन शाहीर दौलत राठोड निराळा तांडा यांस दिग्दर्शक पवार साहेबांनी काल दि. 27/05/2021, रोजी ₹.2500 (दोन हजार पाचशे रु.) मदतीचा हात म्हणून शाहीरांच्या खात्यात ऑनलाईन जमा केले.
पवार साहेबांनी मागच्या वर्षी अन्नधान्यासाठी रूपये पाच हजार बजरंग किराणा दुकान सारखणी ता. किनवट, यांच्या बँक खात्यात जमा केले व या वर्षी त्याच्या घरकुलाच्या डागडुजी करीता दरवाजा व कडीकोंडा यासाठी मंगेश चव्हाण सारखणी यांच्या बँक खात्यात रुपये अडीच हजार जमा केले. अशी एकूण साडेसात हजार रुपयांची (5000+2500 ₹.) आर्थिक मदत त्यांनी केली.
शाहीरांचे घर म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गीताप्रमाणे, ” दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. ” या कुडा, छपराचा आश्रयाला घर तरी कसे म्हणावे ? शाहीराची ही अवस्था पाहून शासनाने घरकूल मंजूर केले. त्याची आर्थिक तरतूद मात्र आखूड चादरी सारखीच, ” डोके झाकावे तर पाय उघडे, पाय झाकले तर डोके उघडे. ” अशा असहाय्य प्रसंगी पवार साहेब आपण शाहीरास मदतीची उभारी दिलात.
दातृद्वय पवार साहेब येथेच थांबले नाहीत. त्यांनी शाहीरांची होत असलेली उपासमार याची वार्ता नामदार मंत्रीमहोदय संजयभाऊ राठोड यांच्या कानावर घातली. पवार साहेबांच्या सांगण्यावरून आमदार संजयभाऊ राठोड यांनी त्यांच्याकडे शाहीर ला मदत म्हणून रूपये दहा हजार (10,000 ₹.) नगदी स्वरूपात दिले. ती रक्कम त्यांनी आज दि.28/05/2021, रोजी किरण कस्तुरवार किनवट यांच्या गुगल पे खात्यात जमा केली. त्यांनी ती दहा हजार रुपयाची रक्कम दौलत शाहीरच्या हाती नगदी घरपोच केले.
या स्वरूपात दोघां दातृद्वयंतानी उपेक्षित शाहीर दौलत राठोड यास भरीव अशी आर्थिक मदत केली. आपण शाहीर दौलत राठोड यास योग्य वेळेस दातृत्वाचा कळवळा दाखवून थोडी का होइना त्याची आर्थिक चणचण दुर केलात.
आपले पितृछत्र भविष्यात असेच या उपेक्षित शाहीरावर असावे. आपण आजपर्यंत अनेक अडल्या नडल्यांची,रंजल्या गांजल्यांची, दुरितांची सेवा करीत आलात. आपल्या हातून अशीच उत्तमोत्तम सेवा घडो.
पुनश्चः शाहीरांकरवी मी आपले ऋण व्यक्त करतो.
धन्यवाद
शब्दांकन : वसंत भा. राठोड, किनवट.
मो. नं. 9420315409, 8411919665.
************************************