नायगाव विधानसभे मधील रस्ते व पुलांसाठी अर्थसंकल्पातून पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी निधी उपलब्ध करून द्यावा – आ. राजेश पवार…
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.7. जिल्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची व पुलांची अवस्था बिकट झाली असून त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी या मतदारसंघाचे (भा.ज.पा.प्रेरणीत* *रिपब्लिकन पार्टी रामदास आठवले* *गट*) जागेवर निवडून आलेले आ.राजेश पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सा.बां.मंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याकडे केली आहे.
यामध्ये नायगाव – पिंपळगाव – होटाळा रस्त्यावर (मुगाव जवळ) पुल बांधकाम, मांजरम – ताकबीड – पळसगाव – देगाव रस्ता प्रजिमा -५५ (पळसगाव व ताकबीड जवळ पुलाचे बांधकाम करणे), घुंगराळा – रुई – बळेगाव प्रजिमा – 38 (रुई बु.गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे), शेळगाव (छत्री)-सुजलेगाव-हंगरगा-औराळा-कोठाळा- हंगरगा-दुगाव रस्ता ( शेळगाव ते कोठाला), सुगाव-सोमठाणा-कुंटूर-सांगवी-धनज-औसा-राहेर रस्ता प्रजिमा -५५ रस्त्याची सुधारणा करणे, मांडणी-कहाळा-बरबडा-कुंटूर-सालेगाव रस्ता प्राजिमा ८५- (भाग कुंटूर ते सालेगाव) या कामांचा अर्थसंकल्पात समावेश करून निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी आ.राजेश पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच पिंपळगाव-विळेगाव-करखेली रेल्वे स्टेशन-चिकना ते येताळा ता.धर्माबाद रस्त्याची सुधारणा, घुंगराळा-रुई-बळेगाव पुल मोऱ्यासह रस्त्याची सुधारणा करणे या कामांचा विशेष दुरुस्ती अंतर्गत समावेश करून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार राजेश पवार यांनी पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.
सदरील रस्त्यांची व पुलांची सुधारणा सुधारणा होणे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून या मागण्या पालकमंत्री पूर्णत्वास नेतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे.