धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या उपक्रमाच्या अकराव्या महिन्यात चौती भ्रमिष्ट नागरिकांचा कायापालट
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.7.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संदेशानुसार समाजातील तळागाळातील लोकांना एकत्रित करून त्यांची कटिंग दाढी करत गरम पाण्याने अंघोळ घालून स्वेटर व नवीन कपडे देऊन भर्मिस्ट व वेडसर नागरिकांचा कायापालट करण्यात आला.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले व लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने सुरू असलेल्या कायापालट उपक्रमाची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ठीक सहा वाजता करण्यात आली.शहरात फिरून अस्तावस्त दाढी कटिंग वाढलेल्या व घाण कपडे घातलेल्या नागरिकांना अरुणकुमार काबरा,सुरेश निल्लावार व सुरेश शर्मा यांनी एकत्रित जीजी रोडवर असलेल्या बालाजी मंदिर परिसरात
आणले.बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग दाढी केली.थंडी असल्यामुळे गरम पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिर चे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती.
कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या नागरिकांना साबण लावून स्नान घालण्यात आले. त्यानंतर स्वेटर व नवीन कपडे देऊन शंभर रुपयाची बक्षिसे दिली.सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.तीन तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.
नांदेड शहरात भ्रमिष्ट अवस्थेत फिरत असलेली व्यक्ती आढळल्यास मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले.