किनवट ते घोटी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कोमरवार यांच्या शेता जवळील 15फूट खोलीचा खड्डा शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने त्वरित बुजवावा अन्यथा आंदोलन
किनवट (प्रतिनिधी)किनवट ते घोटी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने कोमरवार यांच्या शेताजवळ तीन महिन्यापूर्वी 15फूट खोलीचा खड्डा खोदून ठेवला असून या खड्यामुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात असल्यामुळे त्वरित खड्डा बुजउन लोकांच्या जीवीतासी खेळणाऱ्या शारदा कंस्ट्रक्शन कंपनीवर त्वरित कठोर कारवाई करून कंपनीला काळया यादीत टाकावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्यावतीने सहा जिल्हाधिकारी कीर्तीकुमार पुजार यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद केले आहे की कोठारी ते धणोडा या राष्ट्रीय महामार्गाचे कंत्राट शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे कंत्राटदार सुमित मोरगे यांच्याकडून सध्या सी सी रोडचे काम चालू आहे.या कामाचा भाग म्हणून किनवट ते घोटी रोडवर कोमरवार यांच्या शेताजवळ कंत्राटदाराने तीन महिन्यापूर्वी 15फूट खोलीचाजीवघेणा खड्डा खोदून ठेवला असून खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांचा जीव जात आहे. मागील तीन महिन्याच्या काळात या खड्ड्यात शेतकऱ्यांची बरीच जनावरे पडली असून कित्येक जनावरे गंभीर जखमी झाले आहेत.कंत्राटदाराचे मेव्हणे सचिन गांगुर्डे यांना पाईप टाकून खड्डा बुजविन्याची विनंती अनेकदा केली मात्र मुजोर कंत्राटदार ऐकत नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.कंत्राटदाराच्या मुजोरपणामुळे मागील वर्षी या खड्ड्यात मुकुंद अण्ड्रावार हा व्यक्ती खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला होता.व याप्रकरणी किनवट पोलिस ठाण्यात गुन्हासुद्धा दखल झाला होता.तर या खड्यामुळे माहूर तालुक्यातील एका इसमला आपला जीव गमावावा लागला.शारदा कंस्ट्रक्शनच्या खड्ड्याणे आजपर्यंत 4लोकांचे बळी घेतले तरी सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कठोर कार्यवाही होत नसल्यामुळे कंत्राटदार मनमानी कारभार करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पावसाळा लगण्यापुर्वी खड्डा बुजबावा व नागरिकांच्या जीवीतासोबत खेळनाऱ्या कंत्राटदार सुमित मोरगेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवाड, शहर प्रमुख संतोष येलचलवार युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोरडे यांनी निवेदनातुन दिला आहे.
याविषयी सुमित मोरगे यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता ते म्हणाले की, मेंटेनन्स ची कामे सुरू असून लवकरच तो खड्डा बुजविण्यात येईल.