प्रेस संपादक व पत्रकार संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा
किनवट /ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस,किनवट टुडे न्युज नेटवर्क चे संपादक,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते,दै. साहित्य सम्राट चे ता.प्रतिनिधी मा.आनंद भालेराव यांचा वाढदिवस किनवट तालुक्यातील विविध ठिकाणी हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्यावतीने किनवट येथील “आज की न्यूज” कार्यालयात वाढदिवसानिमित्त केक कापून व शाल श्रीफळ देऊन भालेराव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला.या प्रसंगी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रदीप वाकोडीकर,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ता.अध्यक्ष आशिष शेळके, ता.सचिव नसीर तगाले,उपाध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष शेख आतिफ, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम तालुका सहकोषाध्यक्ष मारोती देवकते,ता.संघाटक राज माहुरकर, प्रसिद्धी प्रमुख विशाल गिम्मेकर,गंगाधर कदम,ता.सह सचिव प्रणय कोवे,ता.सदस्य रमेश परचके,कागणे,अरविंद सूर्यवंशी, विनोद पवार आदी उपस्थित होते.
तसेच गोकुंदा येथे अखिल भारतीय अपंग कामगार संघटना चे सचिव राज माहुरकर यांच्या नेतृत्वात वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी युवा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच मदनापूर येथे विनोद पवार यांच्या नेतृत्वात व ता.अध्यक्ष आशिष शेळके,पत्रकार प्रणय कोवे,राज माहुरकर,विशाल गिम्मेकर,रमेश पारचके बंधू सह गावातील सरपंच व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते.
किनवटच्या सामाजिक, राजकिय व पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असलेले शांत, संयमी व उच्चशिक्षितपत्रकार,संपादक,समाजसेवक,शिक्षक आनंद भालेराव यांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने जनमाणसात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
राजकिय क्षेत्रात अनेक पदावर त्यांनी काम केले उत्कृष्ट कार्य केले आहेत.यात नांदेड दक्षता समितीचे सदस्य,गोकुदा उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशा अनेक समिती वर काम करत व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा दांडगा सम्पर्क व अनुभव उपयोगी पडणार आहे..
बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले आनंद भालेराव हे पत्रकार क्षेत्रातही अग्रेसर आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या लिखाणातून निस्वार्थ सेवेच्या व्रताने अनेक गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर वाचा फोडण्याचे कार्य केली आहे व ते आजही करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा सरचिटणीस पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.