किनवट येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला 12मे पर्यंत पोलिस कोठडी
किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील खाजगी व्यवसाय करणारा डॉक्टर विकास विजय सुंकरवार याने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या मुलीच्या तक्रारीनंतर किनवट पोलिसांनी नांदेडच्या तदर्थ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एस. बी डीगे यांनी आरोपीस 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा गुंता या तपासात उघड होणार आहे. शहरातील एका डॉक्टरने त्यांच्याकडे कामावर असलेल्या एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला व त्यातून ती गर्भवती राहिली. सहा महिन्यांची गरोदर असताना पोटात दुखते म्हणून दुसऱ्या डॉक्टर कडे वैद्यकीय तपासणी साठी केली असता त्यांनी सोनोग्राफी साठी पाठविले सोनोग्राफी झाली पण थोड्याच वेळात या सोनोग्राफी सेंटरमध्ये ती प्रसूती झाली. या घटनेबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी डॉक्टरला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
वरील प्रश्नांना उत्तर देताना शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर अशोक बेलखोडे माजी, तज्ञ सदस्य मराठवाडा वैधानिक विकास मंडळ औरंगाबाद व अध्यक्ष आरोग्य विषयक विशेष समिती यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुळात ही बाब अत्यंत गंभीर अमानवी असून संपूर्ण समाजासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. जबाबदार व समाजाभिमुख व्यवसायाची निगडित असलेल्या व्यक्तीकडून असे वर्तन म्हणजे डॉक्टर व्यवसायाची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहे. समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध काय करावा असे ते म्हणाले. सध्यास्थितीत डॉक्टरच्या वर्तनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असून डॉक्टर बद्दल पूर्वीसारखा असलेला विश्वास व आदर कमी होत असताना या घटनेने त्यात भर घातली आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला जात धर्म व समाज नसतो अशा शब्दात त्यांनी निषेध नोंदविला आहे.