भव्य कृषी मार्गदर्शन मेळावा व शासकीय योजनांची माहिती या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी आवर्जून उपस्थिती लावली होती
किनवट प्रतीनिधी; खेडे, गाव विकास संघटनेच्या वतीने दिनांक १३ मार्च २०२२ रोजी गजानन महाराज मंदिर येथे भव्य कृषी मार्गदर्शन मेळावा व शासकीय योजनांची माहिती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी बांधवांचे आवर्जून उपस्थिती होती .
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंजाबराव डख ( हवामान अंदाज तज्ञ ) ,बालाजी शनेवाड कृषी अधिकारी व प्रमुख उपस्थिती काँग्रेसचे युवानेते सुभाषबाबू नायक, शंकर राठोड, भाऊराव जाधव , कुलकर्णी होते.
पंजाब डख यांनी पेरणी कधी करावी , पाउस कधी पडेल ,विजा चमकत असताना कशी काळजी घ्यावी, सोयाबीन, कापूस पिकाचे उत्पादन कसे वाढवावे व हवामानाचा अंदाज कसा घ्यावा या विषयी मार्गदर्शन केले.
बालाजी शनेवाड यांनी शासकीय योजनांची माहिती व कपाशी बोंड अळीला कसे नियंत्रण करावे या विषयी मार्गदर्शन केले
खेडे, गाव विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष विनोद पवार यांनी बोलताना हि संघटना खेड्यापाड्याचा विकास व्हावा या उद्देशाने स्थापन करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून माल पिकवतो पण त्यांना योग्य भाव मिळत नाही.
त्यासाठी पिकवलेले माल कसे विकायचे ते सांगीतले.
खेड्यापाड्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल.
या संघटनेचे काम १५ जिल्ह्यात चालू असून सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत
पुढे बोलताना या संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले आहे.
उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचे व मान्यवरांचे आभार मानले.
संस्थापक उपाध्यक्ष अरुण जाधव यांनी अपार परिश्रम घेतले
सुत्रसंचलन संघटनेचे संस्थापक सचिव दिनेश जाधव यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खेडे, गाव विकास संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.