नवाब मलिक यांच्या अटकेचा शिवसेनेकडून निषेध : महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.25.सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या केंद्रातील भाजपा सरकारविरुद्ध आधार भाजपा विरुद्ध आवाज उठविणाऱ्या मंत्र्यांवर आणि राजकीय पुढार्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्याने या अटकेचा निषेध करण्यासाठी नांदेड येथे महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.
या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधानपरिषद प्रतोद मा.आ. अमरभाऊ राजूरकर,माजी उच्चशिक्षण मंत्री डी.पी.सावंत माजी आम.ओमप्रकाश पोकर्णा, आम.मोहनअण्णा हंबर्डे,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्षमा.गोविंद पाटील नागेलिकर,संजय लहानकर,किशोर स्वामी,नगरसेवक साहेबराव सोनकांबळे,गड्डम,भवरे,दुशांत सोनाळे,गोविंद तोरणे,शिवराज कांबळे, हर्जिंदर संधू, नांदेड महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कविताताई कळसकर,ड्रा.करुणा जमदाडे ललिता कुंभार,अनिता हिंगोले,जिल्हा परिषद सदस्य मीनलताई खतगावकर राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष भोसीकर,ड्रा.सुनील कदम,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर,जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यासह शिवसेनेतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणेच्या इडीकडून काल अटक करण्यात आली.केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची मुस्कटदाबी करण्याचे षड्यंत्र वारंवार रचले जात आहे.तरीही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्राला भीक घालत नाही.अशा परिस्थितीत मंत्र्यांवर खोटे आरोप करत त्यांना अटक करण्याचे कपटी राजकारण केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली.नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या निषेध आणि निदर्शनांमध्ये महाविकासआघाडी मधील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे,जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर,जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख उमेश मुंडे,सह संपर्क प्रमुख प्रकाश मारावार, दक्षिण तालुका प्रमुख उधव पाटील शिंदे,उत्तर तालुका प्रमुख जयंत कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती