नाम फाऊंडेशन पोहोचले आत्महत्याग्रस्त*कुटुंबापर्यंत* *कुटुंबाना भेट देऊन झाले दु:खात सहभागी व दिला* मदतीचा हात
*किनवट,दि.२९(प्रतिनिधी):* किनवट व माहूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबापर्यंत नाम फाउंडेशन पोहचले असून अशा कुटुंबाना भेटी देऊन व त्यांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांना मदतीचा हात दिला आहे.याबद्दल सदगदित झालेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांनी नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मागिल दोन वर्ष करोनाचे सावट असतांना सुध्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालूच होत्या. अशा परिस्थीतीत नाम फाऊंडेशनने शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याचे सुरूच ठेवले आहे. किनवट तालुक्यातील १३ व माहुर तालुक्यातील ८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नामच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पंचविशी हजार रुपयांचा धनादेश देऊन मदत केली आहे. नामच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची विचारपुस केली. या पुढे त्यांना कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, या बद्दल संवाद साधला व मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. यापुर्वीही दिवाळी निमीत्त या कुटुंबीयांना साडी चोळी देऊन व दिवाळी फराळ घरापर्यंत पोहचवून त्यांच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच दिवाळी भेट साने गुरूजी रूग्णालय परिवाराने करोना मृत्युग्रस्त कुटुंबापर्यंतही पोहोचवली आहे.
नाम च्या वतीने डॉ.अशोक बेलखोडे , जिल्हा कार्यवाह प्रा. बालाजी कोंपलवार व केशन घोणसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एकुण १२० कुटुंबांना प्रत्येकी पंचविस हजार रूपये प्रमाणे मदत पोहचवली आहे.