मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नांवर “एक युवक, एक पोस्ट कार्ड” मोहिमे अंतर्गत मुस्लिम युवकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री महोदयांना पोस्टकार्ड पाठवण्याची मोहिमेत टिपू सुलतान ब्रिगेड अग्रभागी
किनवट/प्रतिनिधी;
मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नांवर “एक युवक, एक पोस्ट कार्ड” मोहिमे अंतर्गत मुस्लिम युवकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून मुख्यमंत्री महोदयांना पोस्टकार्ड पाठवण्यात येत आहेत. मुस्लिम समाज अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी संघर्ष करीत आहे. मुस्लिम समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आज आरक्षणाची गरज आहे. महाराष्ट्रातील सकल मुस्लिम युवक 10 टक्के आरक्षण मिळविण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत.
या मोहिमेत टिपू सुलतान ब्रिगेड सुद्धा हिरीरीने भाग घेत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून आज प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद नदीम यांच्या नेतृत्वात किनवट (जि. नांदेड) येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेबांना पोस्टकार्ड पाठविण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष शेख शाकीर, तालुका उपाध्यक्ष शेख इशरत, शहर अध्यक्ष हाफिज तौसिफ, युवा ब्रिगेड तालुका अध्यक्ष शेख रियाज, युवा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष शेख समीर, युवा ब्रिगेड शहर अध्यक्ष शहबाज खान यांनी विशेष परिश्रम घेतले.
याप्रसंगी किनवट आणि परिसरातील मुस्लिम समाजातील असंख्य युवक उपस्थित होते.