दिव्यांगसेवा हीच खरी ईश्वरसेवा – खासदार हेमंत पाटील हिंगोली येथे दिव्यांगाना साहित्याचे वाटप
हिंगोली : दिव्यांगासाठी करत असलेले काम हे कागदोपत्री न करता आपली सामाजिक जबाबदारी आणि त्यांच्याप्रति प्रेम, जिव्हाळा व आपुलकीची भावना ठेवून केल्यास तीच खरी ईश्वर सेवा असेल त्यांना समाजाच्या इतर घटकाप्रमाणे स्थान देऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघातील एकही दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे.असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले.दिव्यांग बांधवांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सर्वोतोपरी सहकार्य केले आहे .यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांकडे हिंगोली येथे नुकतेच भूमिपूजन झालेल्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग एडीप योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( एलिम्को) यांच्या सहकार्याने हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधू-भगिनींना मोफत साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली येथील स्व.शिवाजीराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते.या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ऑनलाइन प्रमुख उपस्थित होती.व्यासपीठावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आ.तानाजी मुटकुळे,समाजकल्याण आयुक्त एस.के.मिनगिरे, यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे , जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे, संदेश देशमुख, माजी जि प उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड ,हिंगोली शहर संघटक किशोर मास्ट हिंगोली तालुका प्रमुख भानुदास जाधव, सेनगाव तालुका प्रमुख संतोष देवकर, जि प सदस्य बाळासाहेब मगर, विठ्ठल चौतमल, श्रीशैल्य स्वामी, उप तालुका प्रमुख प्रताप काळे ,बासंबा सर्कल प्रमुख शिवाजी जाधव यांच्यासह आदी उपस्थित होती.यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की, मागील वर्षी हिंगोली सोबतच लोकसभा मतदार संघात येणाऱ्या 11 तालुक्यात एकूण 15 हजार दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली व त्यांना आवश्यक असलेल्या साहित्यासाठी नाव नोंदणी करण्यात आली होती. पंरतु दरम्यानच्या काळात संपूर्ण देशात कोरोनाच्या सावट असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे दिव्यांग बांधवांना साहित्य देण्यास विलंब झाला.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याकामी सर्व सहकार्य केले. संपूर्ण मतदारसंघात एकूण 6527 दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप केले जाणार असून याकरिता खासदार हेमंत पाटील यांनी 10 लाख रु स्वखर्चातुन उपलब्ध करून दिले आहेत. आज घेण्यात आलेला कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरुपात असल्याने मोजक्याच दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप केले आहे. दिव्यांगाची परिस्थिती लक्षात घेता इतर लाभार्थ्यांना प्रत्येक तालुका स्तरावर साहित्याचे वाटप केले जाणार असल्याचेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.यामध्ये एकूण 83 मोटाराराईज्ड सायकल, 405 ट्रायसायकल, 1402 बीटीई किट, 136 स्मार्टफोन,274 कृत्रिम अवयव यासह विविध 20 प्रकारातील दिव्यांग बांधवांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला दिल्ली येथून ऑनलाईन उपस्थित असलेले सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यवाचनाच्या शैलीत सुरवात करत खासदार हेमंत पाटील करत असलेल्या कामाचे कौतुक करत ” दिव्यांगजनो को न्याय देंगी खासदार हेमंत पाटीलजी की हिंगोली ” अश्या शब्दात प्रशंसा केली.ते म्हणाले की केंद्र सरकार समाजातील सर्वच स्तरातील घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असून समाजातील दीन दलित दुबळे , दिव्यांग , वंचित यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे .त्याचा पुरेपूर लाभ मिळाला पाहिजे त्याकरिता खासदार हेमंत पाटील यांचे सारखे लोकप्रतिनिधी लाभणे ही भाग्याची बाब आहे. जिल्ह्यात यापुढे राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करेल असेल असेही मंत्री रामदास आठवले म्हणाले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ( एलिम्को)चे श्रीसेन गुप्ता,बिपीन शेरावत, गौरीश सोलंके,राजकुमार पावरा,संदेश यादव, व जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्राचे संचालक विजय काणेकर,व डॉ.अनिल देवसरकर,विनय गडदे, विष्णू वैरागड,आणि शिवाजी गावंडे , गजानन थळपते, अमोल बुद्रुक, प्रसाद गाभणे यांचे सहकार्य लाभले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पोहरा, यांनी केले तर आभार एलिम्कोचे जनरल मॅनेजर कर्नल दुबे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या एलिम्को च्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार खासदार हेमंत पाटील यांनी केला व उपस्थित सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली होती.