धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे व त्यांचे पती निर्मिती अकॅडमी,पुणेचे संचालक प्रदिप वाघमारे या दांपत्याने राबविला हा स्तुत्य समाजसेवी उपक्रम
शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था,नागपूर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन,नांदेड या सेवाभावी संस्थांना दिली ती रक्कम
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.14.जिल्यातील धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे व त्यांचे पती निर्मिती अकॅडमी,पुणेचे संचालक प्रदिप वाघमारे या दांपत्याचा मुलगा “सृजन निलम प्रदिप वाघमारे” यांचा दि.१४ डिसेंबर रोजी पहिला वाढदिवस आहे.परंतु,या उच्चशिक्षित दांपत्याने मुलाच्या वाढदिवसावर अनाठायी खर्च न करता ‘ती’ रक्कम शैक्षणिक उद्दिष्ट्ये घेऊन उद्याची सक्षम पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था, नागपूर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन (यूपीएससी एमपीएससी प्रशिक्षण केंद्र) नांदेड,या दोन समाजसेवी संस्थाना प्रत्येकी १० हजार रुपये दिले. अशी माहिती सम्राट प्रसेनजित संस्थेचे मुख्य मार्गदर्शक प्रभाकर शिंदे यांनी दिली असून अशा प्रकारे आपल्या लाडक्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्या-या व स्तुत्य असा समाजसेवी उपक्रम राबविणाऱ्या या दांपत्याचे अनेकांतून अभिनंदन होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून सेवारत असलेल्या नीलम कांबळे व त्यांचे पती निर्मिती अकॅडमी,पुणेचे संचालक प्रदिप वाघमारे या उच्च शिक्षित दांपत्यास शिव-लहु-फुले-शाहू-आंबेडकर-अण्णा भाऊ यांच्या विचारांची अर्थातच आंबेडकरी विचारधारेची ओळख आणि समतामूलक,मानवतावादी,सेवाभावी विचार मूल्यांची जानीव झाली.तेंव्हापासून स्व आणि कौटुंबिक विकासाबरोबरच सामाजिक उत्थानासाठी हे दांपत्य अविरत झटत आहे.या आदर्श दाम्पत्याचा मुलगा “चि.सृजन निलम प्रदिप वाघमारे” याचा दि.१४ डिसेंबर २०२१ रोजी प्रथम वाढदिवस आहे.हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा व्हायला पाहिजे,असे अपेक्षित असतांना सामाजिक जान व भान असलेल्या या दांपत्याने होणाऱ्या अनाठायी खर्चास फाटा दिला व वाढदिवसावर खर्च होणारी ती रक्कम शैक्षणिक उद्दिष्ट्ये घेऊन उद्याची एक सक्षम पिढी घडविणाऱ्या सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था,नागपूर आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन (यूपीएससी, एमपीएससी प्रशिक्षण केंद्र) नांदेड,या दोन समाजसेवी संस्थाना दिली.
प्रतिकूल परिस्थितीतून या दांपत्याने उच्च शिक्षण घेतले व ते आज या पदांवर सेवाकर्तव्य बजावत आहेत.आपण इथवर पोहचलो आहोत.परंतु,आजही समाजातील अनेकजन प्रतिकूल परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांचा संघर्ष पाहता आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांचे काही देणे आहोत व समाजाप्रती आपली ही काही जबाबदारी आहे.याची जान असल्याने या दांपत्याने आपल्या मुलाच्या वाढदिवसावर अनावश्यक खर्च न करता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षण घेत असलेल्या गरीब,होतकरु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक खारीचा वाटा म्हणून ती रक्कम या सेवाभावी संस्थाना दिली.सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था, नागपूर या संस्थेचे मुख्य मार्गदर्शक प्रभाकर शिंदे यांच्याकडे १० हजार रुपये सुपर्द केले असून चि.सृजन चा वाढदिवस अशा प्रकारे साजरा केला आहे.प्रेरणादायी व स्तुत्य असा समाजसेवी उपक्रम राबविणाऱ्या या दांपत्याचे विविध क्षेत्रातून व समाजातील अनेकांतून अभिनंदन होत आहे.
उपरोक्त सेवाभावी संस्थांसह संपादक उत्तम बाबळे व आमच्या परिवाराच्या वतीने आम्ही देखील त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन करतोत व चि.सृजन यास उत्तम आरोग्यासह उदंड आयुष्य मिळो… शुभाशिर्वादासह अनंत मंगल कामना!