दुःखद निधन: प्राध्यापक किशनराव किनवटकर यांचे आज पहाटे हैदराबाद येथील सन शाईन हॉस्पिटल मध्ये मेंदूत रक्तस्त्राव गोठल्याने दुःखद निधन
दुःखद निधन
प्राध्यापक किशनराव किनवटकर यांचे आज पहाटे हैदराबाद येथील सन शाईन हॉस्पिटल मध्ये मेंदूत रक्तस्त्राव गोठल्याने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 5 वाजता किनवट येथे होणार आहे. ते काँग्रेस पक्षाचे नेते नामदार अशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू ,सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पदासह विविध पदे भूषवली होती व ते ज्येष्ठ पत्रकार ही होते.
काॅंग्रेसचे जेष्ठ नेते सेवादलाचे आध्यक्ष, होम गार्डचे मा.जिल्हा समादेशक, युवक काॅंग्रेसचे माजी आध्यक्ष, खरेदी विक्री संघाचे माजी आध्यक्ष मराठी, पञकार परिषदेचे मुख्य सल्लागार, साइबाबा संस्थानचे विश्वस्त , बळीराम पाटील महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राध्यापक, विविध सामाजीक क्षेञातील अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेले व माजी.मुख्यमंञी तथा पालक मंञी आशोकराव चव्हाण यांचे अत्यंत विश्वासु सहकारी लोकप्रीय लोक नेता.प्रा.किशनराव किनवटकर होते.
त्यांच्या अचानक जाण्याने किनवट तालुक्यात सभा नांदेड जिल्हा व तेलंगणा राज्यातील आदीलाबाद जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर अघात झालेला आहे त्यातून त्यांना सावरण्याची ईश्वर शक्ती देवो सरांना किनवट टुडे न्युज कडून भावपूर्ण श्रद्धांजली!