किनवट मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी ला भरभरून प्रतिसाद.
किनवट/प्रतिनिधी:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे डिजिटल सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
किनवट विधानसभा मतदारसंघात ऍड. तुकाराम रेंगे पाटील माजी खासदार परभणी, प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्याचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल सभासद नोंदणी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी किनवट विधानसभा मतदार संघात व हदगाव विधानसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.
याप्रसंगी मतदारसंघातील तालुका अध्यक्ष/ शहराध्यक्ष/ मुख्य नोंदणी कार्यकर्ते/ बूथ नोंदणी कार्यकर्ते/ लोकप्रतिनिधी /पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व प्रकारच्या फ्रंट पदाधिकारी आपापल्या मतदारसंघात डिजिटल सदस्य नोंदणी करीत आहेत.
किनवट येथे ही सदस्य नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी काँग्रेस नेते यादवराव जाधव,तुकाराम बोनगीर, बालाजी दुरपुडे, माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेमानिवर, गिरीश नेमानिवर, नगरसेवक अभय महाजन,नगरसेवक इम्रान खान,जवाद आलम, स.अनवर स.फखरोधीन,शेख शहेनाज,शेख परवीन,लक्ष्मीपती दोनपेलवार,आनंद भालेराव, बाबू नाईक,व इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.