सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नुकत्याच झालेल्या निवासी शिबिरात वंजारवाडी(दिगडी ता. किनवट) येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर
किनवट,ता.२८(बातमीदार): सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या नुकत्याच झालेल्या निवासी शिबिरात वंजारवाडी(दिगडी ता. किनवट) येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले.अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एस.बी.अंभोरे हे होते.
यावेळी न्यायाधिश विजय परवरे,वकील संघाचे अध्यक्ष एड ए.जी.चव्हाण,एड.शामिले,एड.दिलिप काळे यांनी विविध कायद्याविषयी मार्गदर्शन केले. प्रस्तावना प्राचार्य डॉ. आनंद भंडारे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किरण आयनेनवार यांनी केले.प्रारंभी शहिद दिनानिमित्त शहीदांच्या व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी.वकील संघ सचिव एड पंकज गावंडे सेवा समिती सदस्य के.मुर्ती, सरपंच ज्ञानेश्वर किरवले एड. मिलिंद सर्पे एड. एस. एन . राठोड, एड बिपिन पवार, एड. सुनिल येरेकार, एड एस.पी.सिरपुरे,एड निलेश राठोड, एड सम्राट सर्पे, एड अभिजित वैद्य राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.अजय किटे,केशव केंद्रे, प्रा.मनोहर थोरात,माजी सैनिक गुट्टे लिपीक एल.वाय.मिसलवार, गजानन मुतनेपवाड, मुत्यलवार,पोलिस पाटील कांबळे, मुरलिधर गिते, संतोष अनंतवार, विश्वंभर मुसले ,प्रा.डॉ. रामकीशन चाटे, प्रा विवेक चनमनवार,पोलिस. हवालदार दोनकलवार,पठाण, कृष्णा अनंतवार विठ्ठल मुंडे,झाकीर,साईनाथ गुट्टे.गावकरी महीला पुरूष व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आदी उपस्थित होते.