आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेचा जीव वाचविण्यास किनवट पोलिसांना यश
किनवट/प्रतिनिधी: काल दि.29 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता सुमारास किनवटच्याव एका सुजाण नागरिकाद्वारे किनवट पोलीस स्टेशन ला फोनवरून कळविले की, एक महिला पैनगंगा नदीचे पुलावर रडत असून ती जीव देण्याच्या तयारीत आहे तरी ताबडतोब पोलिसांना पाठवण्यात यावे. अशी माहिती मिळताच सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक झाडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपाली शिंदे आदी जाऊन त्यांनी सदर महिलेस ताब्यात घेतले.
तिला पोलीस स्टेशनला आणून तिचे नाव गाव विचारले असता तिने आपले नाव अर्चना खंडू चिबळे असे सांगितले तिचा नवरा खंडू चिबळे हा वनरक्षक असून जलधरा येथे नोकरीस आहे त्याला दारू पिण्याची सवयीचा असल्यामुळे घरी रोजच भांडण करीत असे रोजच्या भांडणाला कंटाळून ती आत्महत्या करण्यासाठी पैनगंगा नदीचे पुलावर आली होती .तिचे मन परिवर्तन करून तिला सुरक्षित रित्या तिची आई वंदना गजानन पांडे राहणार एकांबा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
आत्महत्या करण्यासाठी आलेल्या महिलेचा जीव वाचविण्यास किनवट पोलिसांना यश आले आहे. तत्परता दाखवून महिलेचा जीव वाचविल्यायामुळे पोलिसांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे.