सहशिक्षक अनिल भंडारे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम सपत्नीक संपन्न बहुगुणी व्यक्तिमत्व जोपासणारे नेतृत्व शिक्षक अनिल भंडारे यांच्यात पाहिले – संस्थाचालक बिभीषण पाळवदे
किनवट = (तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील नावाजलेल्या सरस्वती शिक्षण संस्थेत शिक्षक या पदाचा कार्यकाळ पूर्ण करून आपल्यातील एका गुणाला पूर्णविराम दिला, पण आणखी त्यांच्याकडे गायन आणि पत्रकारिता शिल्लक आहे. असे प्रतिपादन शिक्षण संचालक नांदेड जिल्हा अध्यक्ष बिभीषण पाळवदे यांनी शिक्षक अनिल भंडारे यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त कलावती गार्डनच्या व्यासपीठावरून दिनांक 1 आक्टोंबर रोजी केले.
सदर आयोजित सेवापूर्ती सोहळा अत्यंत आनंदात पार पडला. पुढे बोलताना बिभीषण पाळवदे म्हणाले की, भंडारे यांनी आपल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून येऊन शिक्षक पेशा आणि आपले इतर छंद जोपासले. सरळ स्वभाव आणि शब्दाला जपणारे, बोलले तसे चालणारे, विद्यार्थी प्रिय म्हणून भंडारे यांची ओळख आहे. त्यांना पुढील भावी जीवनासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असेही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविलेले बिभीषण पाळवदे यांनी आपले मत मांडले. आणि भाजपाचे जेष्ठ निष्ठावंत राघू मामा व जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर यांनीही आपले विचार मांडले. आणि पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सदर सेवापुर्ती गौरव सोहळ्याला पत्रकार, नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. जेष्ठ पत्रकार प्रदीप वाखोडीकर, संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंगराव सातुरवार, शंकर जायभाये, संजय बिराजदार, मा.नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, भगवान मारपवार, पत्रकार तुपेकर सर, शिवसेना शहराध्यक्ष संतोष ऐलचलवार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष सतिश बिराजदार, पत्रकार प्रशांत वाठोरे, डहाके सर, किरण ठाकरे, आनंद सोनटक्के, पत्रकार मधुकर अनेलवार, मंगेश भटकर सर, इरपेनवार सर, शाळेचे शिक्षक, शिक्षिका पत्रकारां सहीत त्यांच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय सेवापूर्ती सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होता. सदर सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन साप्ताहिक वंजारी पुकारचे संपादक तथा किनवट पत्रकार परिषदेचे अध्यक्ष दत्ता जायभाये यांनी केले तर कार्यक्रमाचे संचलन बापुसाहेब तुपकर सर यांनी केले. तर आभार भंडारे यांनी मानले.