जिप बांधकाम उपविभाग किनवट कार्यालयाचा अजब कारभार.! बोगस कामाची चौकशी न करताच परस्पर बिल काढत आमदार निधीची लावली विल्हेवाट.!
किनवट : या ना त्या कारणाने नेहमीचं चर्चेत असणाऱ्या किनवट जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयात सावळा गोंधळ नेहमीचं चाललेला असतो आणि त्यातल्या त्यात प्रभारीराज मुळे गुत्तेदार आणि शाखा अभियंता यांचे चांगभले होताना दिसतं आहे.आमदार निधीचा कामांची तर अक्षरशः वाट यांनी लावलेली आहे.तक्रार धारकाने पुरव्यानिशी तक्रार केलेली असताना आणि खुद्द प्रभारी अभियंता यांनी चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत बिल काढू नका असे आदेशित केलेले असतानाही सदरील बोगस आणि निकृष्ट दर्जाचा कामाची बिले निघतात कशी हा मोठा संशोधनाचा विषय बनलेला आहे. या कार्यालय अंतर्गत असलेल्या किनवट तालुक्यातील दिगडी मंगाबोडी येथील आमदार निधी अंतर्गत करण्यात आलेल्या 15 लक्ष रुपयांचा बोगस आणि निकृष्ट दर्जाचा कामाची चौकशी करण्याची मागणी आणि ती पूर्ण होत नाही तो पर्यंत बिल काढू नये अशी मागणी तक्रार धरकाने जून महिन्यात केलेली होती ज्यावर आज पर्यंत कोणतीही चौकशी तक्रार धारकासमोर करण्यात आलेली नाही आहे आणि खुद्द प्रभारी अभियंता यांनी बिल काढू नये असे पत्र काढलेले असतानाही त्या कामाची देयके अदा करण्यात आलेली आहेत असे उघड झालेले दिसतं आहे.
सदरील निवेदनावर आज पर्यंत जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेड (उत्तर) मार्फत कोणतीही चौकशी तक्रार धारक समोर करण्यात आलेली नसून त्यामुळे सदरील प्रकरणी भ्रष्ट अधिकारी आणि गुत्तेदार यांना मा.मुख्याधिकारी जिल्हा परिषद कार्यालय नांदेड यांचा कोणताही वचक राहिलेला नाही. उपविभाग कार्यालयात प्रभारी राज असल्याने साध्या माहिती अधिकार पत्रांना केराची टोपली दाखवली जात आहे.
सदरील दिगडी मंगाबोडी येथील आमदार निधी मधून करण्यात आलेल्या जुन्या रस्त्यावरील बोगस आणि निकृष्ट दर्जाचा सीसी रस्ता कामाची चौकशी तक्रार धारक समक्ष करत बोगस आणि निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारला शासनाचा काळ्या यादीत टाकत आणि त्याला पाठबळ देणाऱ्या शाखा अभियंता यांचा वर तात्काळ निलंबनाची कारवाई करत बोगस कामांना लगाम लावावी आणि प्रभारी अभियंत्यांना तात्काळ कार्यमुक्त करत त्यांचा जागी पूर्ण वेळ उप अभियंता नेमत किनवट सारख्या अति मागास आदिवासी भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आनावे या मागणीचे निवेदन असतांनाही बिले निघतात म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे असेच दिसतं आहे.
सदरील प्रकरणी मा.मुख्याधिकारी जीप नांदेड यांनी कोणतीही दखल घेत नसल्याने नाईलाजाने लोकशाही मार्गाने दिनांक 03/10/2023 पासून त्यांचा कार्यालय समोर आमरण उपोषणाला सुरुवात करत असल्याचे निवेदनात नमूद केलेले आहे.