नरसीच्या जि.परिषद शाळा संकुलाचे कार्य कौतुकास्पद – संजय बेळगे
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.जिल्यातील नायगाव तालुक्या मधील नरसी जिल्हा परिषद संकुलाचे कृतिशील सहशिक्षक व ग्रामपंचायत नरसीच्या सहकार्यातून माझी शाळा सुंदर शाळा, शंभर दिवस वाचन,आई बाबा ची शाळा,माझे कार्यालय सुंदर कार्यालय,परसबाग,हर घर बेटीका नाम, शिक्षण आपल्या दारी याचं बरोबर विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तसेच मनोरंजनातून अध्यापन आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्वखर्चाने शाळा रंगरंगोटी करून शाळा परिसर स्वच्छ करणे यासारखे उपक्रम राबविण्यात संकुलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय अप्पा बेळगे यांनी तोंडभरून कौतुक केले.
शिक्षण विभाग नायगाव च्या वतीने नरसी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत कोविड योद्धाचा सत्कार व जिल्हा गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार व शैक्षणिक आढावा बैठक बुधवारी संपन्न झाला यावेळी संजय अप्पा बेळगे यांनी तोंडभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राजमाता राष्टमाता माॅ. जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर परसबाग व डिजीटल शाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच गजानन उर्फ पपु भिलंवडे हे होते तर उद्घाटक म्हणून शिक्षण व बांधकाम सभापती संजय अप्पा बेळगे हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे , सभापती प्रतिनिधी विठ्ठलराव कत्ते ,उपसभापती संजय पाटील शेळगावकर , काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष सभाजी पा.भिलंवडे , राष्ट्रवादी काँग्रेस नेते भास्कर पा भिलंवडे ,प्रमेश्वर पा धानोरकर,गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड, प्रभारी गटविकासाधिकारी अशोक पवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंचायत समिती नायगाव चे सेवानिवृत्त गटविकास अधिकारी पी पी फाजेवाड साहेब यांचा संकुलनाच्या वतीने सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती प्रतिनिधी विठ्ठलराव कत्ते, उपसभापती संजय पाटील शेळगावकर,जिल्हा परिषद सदस्या माणिकराव लोहगावे ,संभाजी पाटील भिलवंडे ,प्रमेश्लर पा धानोरकर गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड,गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे,संजय कोठाळे यांनी शिक्षकांनी रात्रचा दिवस करुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माधवराव कंधारे, दिलीप पांढरे,माधव कोरे,ताकबीडे सर, अशोकराव बावणे, विजय गबाळे, बालाजी पांपटवार, मुख्याध्यापक नरबलवार,बंडु पा भोसले, गंदपवाड,अलिवाड,तालुक्यातील सर्व मु.अ.अंगणवाडी कार्यक्रत्या, नरसी संकुलातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचलन अमलापुरे यांनी केले तर आभार मिरेवाड यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरसी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले