आ.रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत निळकंठ ताकबीडकर यांनी मंनगटावर बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ.
नरसी/ प्रतिनिधी.(मारोती सूर्यवंशी)
सामाजिक व राजकीय चळवळीतील सर्वत्र दूर पर्यंत आपल्या अभ्यासू व तितकेच प्रभावी वक्तृत्वाने प्रसिद्ध असलेले नायगाव तालुक्यातील युवा नेतृत्व श्री.निळकंठ ताकबीडकर यांनी दि.१८ ऑक्टोबर रोजी राज्याचे युवा नेते आमदार रोहित दादा पवार यांच्या उपस्थितीत नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.ताकबीडकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात परखड व वैचारिक दृष्टीकोन व ,तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करण्याची इच्छा असलेला सहकारी मिळाल्याचा आनंद त्यांनी पक्ष प्रवेश सोहळ्या व्यक्त केला.
मा.निळकंठ ताकबीडकर हे महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवराय, फुले ,शाहू ,आंबेडकर यांच्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहेत.वंचित आघाडी आणि आंबेडकर परिवार यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांनी सामाजिक, व राजकीय क्षेत्रात अल्प कालावधीत ओळख निर्माण केली होती.मागच्या काही काळात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहराव भोसीकर साहेब व युवकांचे तसेच जन सामन्याचे लाडके व्यक्तिमत्त्व एक अत्यंत कुशल संघटक जनतेच्या हाकेला ओ देवून कार्य करणारे नायगाव तालुकाध्यक्ष भास्कर दादा भिलवंडे यांच्याशी जवळीक वाढल्याने त्याचा पक्ष प्रवेश झाल्याची चर्चा आहे.
एकंदरीत दोन युवा पिढी चे नेते, व ज्येष्ठ मार्गदर्शक हरिहर राव भोसीकर यांच्या समन्वयाने जिल्ह्यात ,तसेच नायगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला गत वैभव प्राप्त होईल असे मत अनेकांनी व्यक्त केले.
या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी व्यासपीठावर राष्ट्रवादी युवक कार्यध्यक्ष रविकांत वरपे,सभापती शिरीष गोरठेकर,प्रदेश सचिव नाना बोराडे, निशांत वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष प्रांजली रावणगावकर ,युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका कैवारे,संतोष दगडगावकर,बालाजी पा. सांगवीकर ,नायगाव तालुका कमिटीचे श्याम पाटील चोंडे, गजानन पा. होटाळकर,माधव कोरे,संजय चव्हाण,माधव बेंद्रीकर यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.