किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

महा मार्ग रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा* अन्यथा  सामूहिक आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा* *इशारा*…

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.10.जिल्ह्यातील हिमायतनगर -भोकर  महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी गेलेल्या शेत जमिनी चा  मोबदला तात्काळ देण्यात यावा.अशी मागणी सातत्याने करूण ही मोबदला मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हदगाव यांना दिलेल्या निवेदनात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर,भोकर अंतर्गत रस्त्यावर सोनारी फाट्याजवळ टोल प्लाझा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१  साठी सोनारी व सरसम येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या म्हणून दि.२६ फेब्रुवारी २०१८ रोजी  निवेदन देवून मावेजा मिळण्यासाठी मागणी केली होती.जवळपास काम ही पुर्णत्वाकडे गेले आहे.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.संबंधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हदगाव यांच्याकडे निवेदन दिले असता  दि.११.ऑक्टोबर २०१९ रोजी तिन महिन्याच्या आत सदरील शेत जमिनीचा मोबदला देण्याचे लेखी पत्र दिले होते,परंतु मोबदला देण्यात आला नसल्याने  पुन्हा एकदा रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.त्याचबरोबर सातत्यानं पाठपुरावा करून ही मोबदला मिळत नसल्याने दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदरील शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असता एक दिड महिन्यात मोबदला देण्याचे पुन्हा एकदा आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते, परंतू शेतकऱ्यांच्या पदरी पून्हा एकदा घोर निराशा पडली आहे.

आता आम्हा शेतकऱ्यांच्या भावनाचा बांध फुटला असून आत्मदहनाशिवाय आम्हाला पर्याय नाही,आम्ही नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनासह मंत्री,खासदार आमदार यांची ही भेट घेऊन निवेदन दिले,परंतू त्यांनीही आमच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही.म्हणून दि.१२.फेब्रुवारी २०२२ पर्यत मोबदला दिला नाही तर  दि.१५ फेब्रुवारी ला दुपारी  ०१ वाजता सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला  आहे.

346 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.