किनवट तालुक्यातील ग्रामपंचायतीत प्रस्थापितांना मतदारांनी दिला दे धक्का..;अनेक नवीन चेहऱ्यांना संधी.
किनवट/प्रतिनिधी: किनवट तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीचा निकालानी प्रस्थापितांना मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. मतदारांनी नविन चेहऱ्याना संधी दिली असून जिल्हा परिषद च्या तीन माजी सदस्यांच्या पॅनलला मोठा धक्का बसला आहे.
दोन ग्रामपंचायती बिनविरोध तर एका ग्रामपंचायतीवर अनुसूचित जमाती उमेदवार नसल्याने पद रिक्त आहे. मतदान व मतदान मोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या निवडणुकीतून आगामी जिल्हा परिषद,पंचायत समितीचे भव्य ठरणार आहे..
किनवट तालुक्यातील 44 ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला.
गोकुंदा ग्रामपंचायत
तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकुंदा ग्रामपंचायत वर काँग्रेसचे जेष्ठ नेते नारायणराव सिडाम यांच्या ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ.अनुसया संजय सिडाम यांनी प्रस्थापितांना धक्का देत विजयश्री खेचून आणली.
बोधडी ग्रामपंचायत
तर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या बोधडी येथील ग्रामपंचायतवर भाजपाचे तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे यांच्या पॅनल ने जिल्हापरिषद सदस्याच्या पॅनलला पराजित करून विजयश्री खेचून आणला.
मांडवी ग्रामपंचायत
तर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत व मोठी बाजारपेठ असलेल्या मांडवी ग्रामपंचायती वर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्या संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्या पॅनलने विजय मिळविला. तर त्यांचेविरोधक माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा दारुण पराभव झाला. तर घोटी येथे प्रस्थापितांना धक्का देत बहुजन लोकराज्य ग्राम विकास पॅनलने बाजी मारली. निराळा तांडा येथे एसटी प्रवर्गाचा त्या ग्रामपंचायतला उमेदवार असल्याने तेथील सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले. तर सस्क्रूनाईक तांडा येथे त्या ठिकाणी एसटी प्रवर्गाचे एकही उमेदवार नसल्याने त्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. अंबाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध तर राजगड येथेही सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहे.
तालुक्यातील सरपंच कोमल संतोष तळेवाड निचपुर, श्रीराम लक्ष्मण शेडमाके पिंपळगाव, दुलाजी मारुती गेडाम कोपरा, सुमनबाई काशीराम पेंदोर मांडवी, संतोष रामा गुहाडे प्रधान सांगवी, अनुसया संजय सिडाम गोकुंदा, अनुसया करण कोवे सावरी, मनोज भिमराव परचाके गौरी, निर्मलाबाई माधव मेश्राम घोटी, अनुसया शामराव तडसे कमठाला, पंडित आनंदराव व्यवहारे कनकवाडी, सुनीता गोविंद आत्राम मांडवा, प्रदीप लक्ष्मण नागझरी, सीमा गंगाराम आडे शिंगोडा,बाबू दिगंबर गायकवाड बोरगाव, बेबीताई भीमराव कुरसंगे लोणी, चिरंजीव माधव मडावी यंदा पेंदा, बालाजी रामराव भिसे बोधडी बुद्रुक, सुनिता संजय अंबोटे, अंदबोरी (ची), निलेश माधवराव कुमरे धानोरा (सी),कौशल्याबाई सुखदेव मेश्राम उमरी बाजार, सरस्वती देवराव नखाते सिंगारवाडी, श्रावण ब्रह्माजी मिरासे दिग्रस, बामनाजी चंपती मेटकर डोंगरगाव, सामताई अनिल टेकाम पाथरी, विमाबाई देवराव जाधव मानसिंग नाईक तांडा, अनुसया भीमराव कनाके व वजरा बुद्रुक, परमेश्वर नारायण खोकले सिंदगी मोहपुर, रुक्मिणी नारायण टारपे कुपटी खुर्द, अजय भिकू उईके चिंचखेड, सुवर्णा देविदास आमले मोहपूर, वैशाली अनिल पाचपुते जलधरा, जयश्री देविदास झळके तलारी, राजू सुदर्शन आत्राम कणकी, तुळशीराम भीमराव कुडमिथे नागपूर, सिताराम यशवंत गेडाम शिरपूर, साईनाथ सुभाष दासरवाड परोटी, सोनाबाई शामराव देशमुख थारा, वनिता अविनाश गेडाम आंमडी, शांताबाई बेमाजी टारपे सावरगाव, अनिता लक्ष्मण पारधी राजगड, रंजना गोविंद अंकुरवाड कोल्हारी, देवानंद किशन कोठुळे राजगड तांडा, उत्तम भीमा मेश्राम कोठारी (सी).
या निवडणुकीत एकूण 22 महिला व 24 पुरुषांना सरपंच पदाची संधी मिळाली. सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर मृणाली जाधव यांनी या निवडणूक प्रक्रियेची एकूणच नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्या. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.